एकनाथ शिंदे रात्री 2 वाजता दिल्लीतून ठाण्यात येताच मोठी घडामोड, ठाकरे गटाला मोठा धक्का, चार नगर
Akola Thackeray Camp Nagarsevak joins Shinde Camp: दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर महाराष्ट्रात परत येताच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला (Shivsena) मोठा धक्का दिला आहे. एकनाथ शिंदे यांच्या पक्षाकडून ठाकरे गटाचे अकोल्यातील चार नगरसेवक (Nagarsevak) फोडण्यात आले आहेत. यामुळे अकोल्याच्या (Akola news) राजकारणात मोठा भूकंप झाला आहे. हा उद्धव ठाकरे यांच्यासाठी मोठा झटका मानला जात आहे. अकोला महानगरपालिकेतील सहापैकी चार नगरसेवकांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. (Maharashtra Politics news)
नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत निवडून आलेले सहापैकी चार नगरसेवक शिंदेंच्या शिवसेनेत गेल्याने अकोल्याच्या राजकारणात उलथापालथ होण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे हे सोमवारी रात्री दिल्लीला गेले होते. मंगळवारी त्यांनी पंतप्रधान मोदी यांची भेट घेतली. या दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल दीड तास चर्चा झाली. यावेळी पंतप्रधान मोदी आणि एकनाथ शिंदे यांच्यात महाराष्ट्रातील राजकीय समीकरणांविषयी चर्चा झाल्याची शक्यता आहे. त्यानंतर मंगळवारी रात्री उशीरा एकनाथ शिंदे राज्यात परतले. ते रात्री दोनच्या सुमारास ठाण्यात आले. त्यावेळी अकोल्यातील ठाकरे गटाचे नगरसेवक त्याठिकाणी आले होते. रात्री दोन वाजता या नगरसेवकांनी एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील नंदनवन निवासस्थानी शिवसेनेत पक्षप्रवेश केला. या चार नगरसेवकांसह ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख मंगेश काळे यांनीही शिंदेंच्या शिवसेनेचा भगवा खांद्यावर घेतला. शिंदे गटात पक्षप्रवेश केलेल्या नगरसेवकांमध्ये मनोज पाटील सागर भारुका सुरेखा काळे आणि सोनाली सरोदे या नगरसेवकांचा समावेश. आता अकोला महानगरपालिकेत ठाकरे गटाचे फक्त दोन नगरसेवक उरले आहेत. प्रवेश केलेल्या नगरसेवकांमध्ये नुकतीच महापौर पदाच्या महाविकास आघाडीने वंचित बहुजन आघाडीच्या पाठिंबावर उमेदवार असलेल्या सुरेखा काळे यांचाही समावेश आहे. ही एकूणच परिस्थिती अकोल्यातील ठाकरे गटाच्या संघटनेसाठी प्रतिकूल आहे. त्यामुळे आता यावर उद्धव ठाकरे किंवा पक्षाचे अन्य पदाधिकारी काय प्रतिक्रिया देतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
Akola news: कोणत्या नगरसेवकांनी शिंदे सेनेत प्रवेश केला?
मंगेश काळे (जिल्हा प्रमुख उबाठा)
मनोज पाटील (नगरसेवक उबाठा )
सागर भरुका ( नगरसेवक उबाठा)
सोनाली सरोदे ( नगरसेवक उबाठा)
सुरेखा काळे ( नगरसेवक उबाठा)
Satara news: जावळीत महायुतीत बिघाडी, शिवेंद्रराजे-शशिकांत शिंदेंच्या छुप्या युतीचा आरोप
शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख अंकुश बाबा कदम यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपचे आमदार शिवेंद्रराजे भोसले आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते शशिकांत शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत “आम्हाला अंधारात ठेवून या दोन्ही नेत्यांनी हातमिळवणी केली आणि जावलीच्या जनतेचा विश्वासघात केला असल्याचे ते म्हणाले.
जावळी पंचायत समितीच्या सभापतीपदी काल भाजपचे सौरभ शिंदे यांची निवड झाली. या निवडीनंतर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अंकुश बाबा कदम यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना महायुतीमधील मित्रपक्ष असलेल्या भाजपवरच निशाणा साधला. “आम्ही निवडणूक स्वतंत्रपणे लढलो, कारण आमच्या घटक पक्षाने (भाजप) कधीही एकत्र येण्याची भावना व्यक्त केली नव्हती. शिवसेनेला अस्तित्वच नाही. अशा पद्धतीने आम्हाला कायम गृहीत धरले गेले. “शिवसेनेचे २ आणि राष्ट्रवादीचा १ असे ३ सदस्य मिळून ‘ईश्वर चिठ्ठी’द्वारे सभापती निवडण्याचे ठरले होते. याबाबत शशिकांत शिंदे यांच्याशी चार-पाच वेळा चर्चा झाली होती. मात्र, ऐनवेळी शशिकांत शिंदे आणि शिवेंद्रराजे यांच्यात खलबतं झाली. राष्ट्रवादीच्या उमेदवार शिल्पा शिंदे यांना अर्ज भरण्यास सांगूनही त्या तटस्थ राहिल्या, ज्यामुळे भाजपचा विजय सुकर झाला. राष्ट्रवादीने अशी भूमिका का घेतली? त्यांना आम्हाला अंधारात का ठेवले?” असा सवाल यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अंकुश बाबा कदम यांनी उपस्थित केला आहे.
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.