बाईचं नाव रविंद्र असतं का? बोटावरील शाई नाही, लोकशाही पुसली जातेय; उद्धव ठाकरेंचा घणाघात
मुंबई : राज्यातील 29 महापालिकांसाठी (Mahapalika) आज सकाळपासून मतदानाला (voting) सुरुवात झाली आहे. मात्र, काही महापालिकांमध्ये निवडणूक आयोगाच्या कारभारावरुन गोंधळ उडाला आहे. मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी मतदानाचा हक्क बजावल्यानंतर निवडणूक आयोगाला काही प्रश्न विचारले आहेत. आता, उद्धव ठाकरेंनीही पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आयोगाच्या कारभारावर अनेक सवाल केले आहेत. तसेच, देवेंद्र आणि चोर कंपनी हारली आहे म्हणून त्यांच्या पराभवाची कारण आम्ही शोधतोय. तर, मतदान केंद्रावर लावण्यात आलेली बोटावरील शाई पुसली जात नसून लोकशाही पुसली जात असल्याचंही उद्धव उद्धव ठाकरे म्हटलं.
मतदान काही नवीन विषय नाही, आता असा प्रश्न विचारायला गेला पाहिजे शाई पुसल्या गेली का? भाजप आणि मित्र पक्षांनी अनेक प्रयत्न केले आहेत. ईव्हीएम घोटाळा, मतदार यादी बरेच काही आहे, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषदेत मोबाईल दाखवत, बाईचं नाव रविंद्र असेल का? असा सवाल उपस्थित केला. भाजपच्या पाट्या मतदान केंद्रावर ठेवल्या जात आहेत, बोटावरची शाई पुसली जात आहे. निवडणूक आयोग आणि आयुक्त कसला पगार खात आहेत? महाराष्ट्रात 9 वर्षांनंतर निवडणूक होत आहेत. नवीन मतदार येतात-जातात, मात्र सुधारणा कसल्याही दिसत नाही. तुमच्याच माध्यमातून बातम्या येत आहेत, असे म्हणत मतदान प्रक्रियेत उडालेल्या गोंधळावरुन उद्धव ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार निशाणा साधला.
महापालिका निवडणुकांसाठीच्या मतदानाचा आणि मतमोजणीचा वेगवेगळा दिवस आहे. आता, प्रभाग क्रमांक 226 चे पत्र बघा, टपाली मतदान जे झालं आहे, त्यात दुपारी 3 वाजता स्ट्राँग रुममधून बाहेर काढण्यात येणार आहेत, त्यासंदर्भात सूचना द्यायला हवी. संविधान म्हणते मतदार करा आणि निवडणूक आयोग म्हणते करुनच दाखवा, असं सगळं सुरू आहे. मुख्यमंत्री म्हणतात हा रडीचा डाव आहे, मग तुम्ही काय अधिकाऱ्यांना घरगडी नेमले आहात का? त्यांना इतकी खा.. खा.. कशी काय सुटली आहे. महायुतीकडे कर्तृत्व नाही आहे, गणेश नाईक यांचा टांगा आहे की नाही, का फिरुन फिरुन टांगा दुखल्या त्यांच्या, टांगा दुखल्या, घोडा फरार.. असे म्हणत उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंवर नाव न घेता हल्लाबोल केला.
एकनाथ शिंदेंवर टीका
निवडणूक आयुक्तांना निलंबित करायला पाहिजे, गणेश नाईक यांचे मतदान केंद्र फरार आहे. बहुतांश ठिकाणी दुबार मतदारांची नावं पुढे येत आहेत. मतदान केंद्रावरील केवळ शाई पुसली जात नाही, तर ही लोकशाही पुसली जात आहे, अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी निवडणूक आयोगावर हल्लाबोल केला. निवडणूक आयोग खात्रीपूर्वक कसं सांगू शकतात की, शाई पुसली तरी मतदान होणार नाही, असेही उद्धव ठाकरेंनी म्हटले.
दुबार मतदारांचे हमीपत्र किती मिळाले ?
दुबार मतदारांचे किती हमीपत्र त्यांना मिळाले आहेत? सत्ताधाऱ्यांचे कुभान आम्ही फोडतोय. दरोडा घालण्याचा प्रयत्न केला जातोयतो आम्ही समोर आणतोय. देवेंद्र आणि चोर कंपनी हरलेली आहे, म्हणून आम्ही त्यांच्या पराभवाची कारणं शोधत आहोत. उमेदवारांचा मतदाराचा अधिकारच हिरावून घेतला जातोय. त्यामुळे, निवडणूक आयोगाचा कर्मचारी काय करतो हे बघावं लागेल? नुसते बसत आहेत, इतके वर्ष झाले तरी नोंदणी होत नाही. आयुक्तांची जबाबदारी असेल तर त्यांच्यावर देखील कारवाई झाली पाहिजे, अशी मागणीही उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषदेतून केली आहे.
मी पण शाई पुसून बघणार – ठाकरे
मी पण शाई पुसून बघणार आहे, पण दुबार मतदानाला मी जात नाही. देवेंद्र फडणवीस आणि आयोग जर हे नाकारत असेल की शाई पुसली गेली नाही तर ह्या दोघांची सहभाग आहे, असेही ठाकरेंनी म्हटले. मतदार राजा असतो, आयुक्त नसतो, सध्या लोकशाहीचा खून करण्याचा प्रयत्न होतोय. मतदान करा, गुंड भ्रष्ट यांच्याकडे सत्ता सोपवू नका, असे आवाहनही उद्धव ठाकरेंनी यावेळी केले.
हेही वाचा
अकोल्यात पडदाशीन यंत्रणेचा बोजवारा, बुरखाधारी महिलांना ओळख न पटवताच सोडलं; मतदान केंद्रावर गोंधळ
आणखी वाचा
Comments are closed.