राज ठाकरे कडाडले, जयंत पाटलांनी पुरावे दाखवले; उद्धव ठाकरे म्हणाले, निवडणूका रद्द करा; निवडणूक


उधव ठाकरे-राजा ठाकरे यांनी निवडणूक आयोगाची बैठक घेतली मुंबई: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांआधी विरोधकांनी निवडणूक आयोगाविरोधात (Election Commission) वज्रमूठ उगारलीय. महाविकास आघाडीसह मनसे आणि इतर विरोधी पक्षातील शिष्टमंडळाची (15 ऑक्टोबर) पुन्हा राज्य निवडणूक आयुक्त आणि राज्य निवडणूक मुख्य अधिकारी यांच्यासोबत बैठक झाली. या बैठकीसाठी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), राज ठाकरे (Raj Thackeray), जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, जयंत पाटील ( शेकाप), बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, रईस शेख, अनिल परब, अनिल देसाई, अजित नवले उपस्थित होते. या बैठकीत नेमकं काय काय घडलं?, कोणत्या नेत्याने कोणते मुद्दे मांडले, याबाबत जाणून घ्या…

मनसेप्रमुख राज ठाकरे काय म्हणाले?

  1. निवडणुका लढवतं राजकीय पक्ष, राजकीय पक्षांना शेवटची मतदार यादी दाखवत का नाही – राज ठाकरे
  2. मतदार नोंदणी बंद करून लपवाछपवी कशासाठी ? – राज ठाकरे
  3. सर्व राजकीय पक्षांचं एकमत होत नाही तोपर्यंत निवडणूक घेऊ नका – राज ठाकरे
  4. आमचं तुमचं करू नका, आमच्यासाठी निवडणूक आयोग एकच – राज‌ ठाकरे
  5. सत्तेतील तीन पक्षांसाठी तुम्ही काम करत नाही – राज ठाकरे
  6. आमचं तुमचं करू नका, आमच्यासाठी निवडणूक आयोग एकच – राज‌ ठाकरे
  7. राजकीय पक्षांना क्लिअर झाल्याशिवाय निवडणूक घेऊ नका – राज ठाकरे
  8. निवडणूक कार्यक्रम रद्द करा – राज ठाकरे
  9. बाळासाहेब थोरात ८ टर्म ८०-९० हजार मतांनी निवडणूक जिंकतात, यंदा लाखाने पडले, हे कसे शक्य – राज ठाकरे
  10. याद्या आम्हाला द्या, आम्हीही शहानिशा करू – राज ठाकरे
  11. मतदार यादीत घोळ असेल तर तुम्ही सुप्रीम कोर्टाला सांगा, आम्ही तयार नाही ते – राज ठाकरे
  12. निवडणूक पुढे ढकला – राज ठाकरे
  13. निवडणूक आयोगाला निवडणूक घेण्याशिवाय काय काम – राज ठाकरे

उद्धव ठाकरे काय म्हणाले?

  1. सत्य स्वीकारा आणि निवडणूक रद्द करा – उद्धव ठाकरे
  2. VVPAT तुम्ही घेत नाही, म्हणजे सर्व पुरावे तुम्ही नष्ट कराल – उद्धव ठाकरे
  3. निवडणूक आयोग हा काही हरिश्चंद्र नाही – उद्धव ठाकरे

काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात काय म्हणाले?

  1. आता स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आहेत. त्याबाबतही अनेक तक्रारी – थोरात
  2. आम्ही विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान ज्या त्रुटी सांगितल्या होत्या त्यावर काम झाले नाही – थोरात
  3. आता स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आहेत. त्याबाबतही अनेक तक्रारी – थोरात

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील काय म्हणाले?

  1. तेश्वर गंगाराम शिंदे हा उदगीर मतदार आहे. त्याचा कोणता ठावठिकाणा नाही – जयंत पाटील
  2. EPIC क्र. वेगवेगळा असायला पाहिजे. बरेच मतदार असे की ज्यांना एकच EPIC  क्र. – जयंत पाटील
  3. आम्ही अर्ज केला, जाब विचारलं तर आयोग उत्तर देत नाही – जयंतराव पाटील
  4. जयंत पाटील सर्व पुरावे निवडणूक आयोगासमोर ठेवले.
  5. जयंतराव पाटील यांनी यादी समोर ठेवताच निवडणूक आयोग तपासतो म्हणाले.
  6. नालासोपारा येथील नाव सुषमा यादव ही खोटी मतदार… आम्ही तिथे गेलो शहानिशा केली. लगेच संध्याकाळी हे नाव काढले

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड काय म्हणाले?

  1. तुमची यंत्रणा सज्ज नाही – जितेंद्र आव्हाड
  2. दुबार मतदार आहेत – आव्हाड
  3. एका पक्षाला पाहिजे तशी वॉर्ड रचना झाली – जितेंद्र आव्हाड

काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार काय म्हणाले

  1. देवांग दवे कोण आहे, याची माहिती घ्या – वडेट्टीवार
  2. हा माणूस भाजपचा आहे, हा निवडणूक आयोगाचा मीडिया हाताळतो – वडेट्टीवार
  3. यादीत खुप घोळ तर मग ही निवडणूक पारदर्शक कशी ? – वडेट्टीवार

निवडणूक आयोगाला शिष्टमंडळ काय भेटतंय? (What is the delegation meeting with the EC?)

  1. निवडणूक यंत्रणेवरील विश्वास दृढ करण्यासाठी चर्चा
  2. लोकशाही बळकट करण्यावर चर्चा
  3. स्था.स्व.संस्थांच्या निवडणुका पारदर्शी व्हाव्या अशी मागणी
  4. महाराष्ट्रातील मतदारयाद्यांचा घोळ दूर करावा अशी मागणी

https://www.youtube.com/watch?v=jyp6xzqzbmq

संबंधित बातमी:

Raj Thackeray on Election Commission: मतदारयादी कशासाठी लपवताय, राजकीय पक्षांना शेवटची यादी का दाखवत नाही? राज ठाकरेंची निवडणूक आयोगाला प्रश्नांची सरबत्ती

आणखी वाचा

Comments are closed.