शिवसेनेचा प्रमुख कोण हे उपरा ठरवू शकत नाही, उद्धव ठाकरेंचा अमित शाहांवर हल्लाबोल

उद्धव ठाकरे अमित शहांवर जिथे जिथे गद्दारी झाली आहे तिथे तिथे मतदार संघात जाऊन मतदारांची माफी मागणार असल्याचं वक्तव्य ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलं. शिवसैनिकांनी रक्ताचं पाणी करुन तुम्हाला मशालीवर निवडून दिल्याचे ठाकरे म्हणाले. शिवसेना पक्षप्रमुख एकच दुसरा पक्षप्रमुख कोणी होणार नाही लोकही स्वीकारणार नाहीत असे ठाकरे म्हणाले. तू तुझ्या अवकातीत राहा, शिवसेना प्रमुख कोण हे तुझ्यासारखा उपरा ठरवू शकत नाही असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर टीका केली. खुर्ची बुडाखाली आहे म्हणूण  लोक तुला घाबरतात असे ठाकरे म्हणाले.

शिवसेनाप्रमुख एकच होऊन गेले, दुसरा होणे नाही

शिवसेना एकच आहे, ती म्हणजे एकनाथ शिंदे यांची असे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह कोल्हापूरमध्ये म्हणाले होते. या त्यांच्या टीकेला आज उद्धव ठाकरेंनी प्रत्युत्तर दिले. शिवसेना एकच आहे ती म्हणजे बाळासाहेब ठाकरेंची असे उद्धव ठाकरे म्हणाले. तुमच्या पक्षाचे अध्यक्ष कोणीही होऊ शकतं. कोणीही उचलतात आणि त्या खुर्चीवर बसवतात. पण शिवसेनाप्रमुख एकच होऊन गेले, दुसरा होणे नाही असे ठाकरे म्हणाले. उपऱ्यांनी त्याचं घर सांभाळावं. त्यांना पंतप्रधान पदाची स्वप्न पडत असतील म्हणून दुसऱ्याचे खासदार फोडून स्वत:च्या खुर्च्या बळकट करण्याचा प्रयत्न करत असल्याचे ठाकरे म्हणाले.

भाजपला आपण बोट धरुन मोठं केलं

अनेकदा शिवसेना फोडण्याचा प्रयत्न झाला. पण तुम्ही कट्टर शिवसैनिक आहात. पण भाजपला आपण बोट धरुन मोठं केलं. स्वतःचा काय नाय दुसऱ्यांची पोरं चोरुन फोडून काम करतात अशी टीका ठाकरेंनी केली. 25 वर्षे काँग्रेसची राजकीय कारकिर्द पाहा त्यांनी कधी शिवसेनेला फोडायचा प्रयत्न केला नाही असे ठाकरे म्हणाले. पण हे प्रयत्न भाजपने केल्याचे ठाकरे म्हणाले.

ज्यांना लढायचं त्यांनी समोर मैदानातून लढा

ज्यांना लढायचं त्यांनी समोर मैदानातून लढा. आज तुम्ही जे प्रचार करत आहात 2019 मध्ये मोदीच्या चेहऱ्यावर तुम्ही निवडून आला आहात. बाळासाहेबांचा आशीर्वाद आणि तुमच्या चेहरा होता. मी असं म्हणत नाही माझ्या चेहऱ्यावर निवडून आले. त्यांनी नवीन शोध लावला, शिवसेना एकच आहे ती माझी आमची बाळासाहेबांची आहे असे ठाकरे म्हणाले. त्याला माहिती नाही त्याच्या पक्षाचे कोण आहे.  शिवसेना प्रमुख एकच आहेत, त्यांच्या शिवाय दुसरा कोणी होणार नाही असे ठाकरे म्हणाले. भाजपाला कोणीही अध्यक्ष चालतो. शिवसेना पक्षप्रमुख एकच दुसरा पक्षप्रमुख कोणी होणार नाही लोकही स्वीकारणार नाहीत असे ठाकरे म्हणाले. ज्या दिवशी शिवसेना स्थापन झाली ती भूमिपुत्रांसाठी झाली. तू तुझ्या अवकातीत राहा, शिवसेना प्रमुख म्हणतात, आई जगदंबेचे सुरक्षा कवच माझे शिवसैनिक आहे.  जर त्यांना पंतप्रधान करायचे स्वप्न पाहत असतील तर तुमचा  संताप कशासाठी असे ठाकरे म्हणाले.

Comments are closed.