US Plane Crashed – मिसिसिपीमध्ये विमान कोसळले; दोन मुलांसह 6 जण बेपत्ता

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

अमेरिकेतील मिसिसिपीमध्ये सहा जणांना घेऊन जाणारे छोटे प्रवासी विमान कोसळले. अपघातानंतर दोन लहान मुलांसह सहा जण बेपत्ता असून त्यांचा शोध घेण्यात येत आहे. पास्कागौला किनारपट्टीजवळ मंगळवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास ही दुर्घटना घडली.

लोकमत टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, फेडरल एव्हिएशन ॲडमिनिस्ट्रेशन (FAA) नुसार, ‘210’ प्रकारच्या या विमानाने न्यू ऑर्लीन्सवरून फ्लोरिडातील फोर्ट मायर्सच्या दिशेने उड्डाण केले होते. यानंतर दुपारी साडेतीनच्या सुमारास हे विमान पास्कागौलाजवळ कोसळले. विमान कोसळण्यापूर्वी दर मिनिटाला 10,000 फूट वेगाने खाली येत होते, असे यूएस कोस्ट गार्डच्या मोबाईल सेक्टरचे जनसंपर्क अधिकारी जुआन रॉस यांनी सांगितले.

अपघातावेळी विमानात 8 आणि 10 वर्षे वयाची दोन मुले आणि चार प्रौढ व्यक्ती होत्या. बचाव पथकाला अपघातस्थळी विमानाचे अवशेष, लाईफ जॅकेट्स आणि लाईफ राफ्ट्स सापडले आहेत. शोध मोहिमेत मिसिसिपी डिपार्टमेंट ऑफ मरिन रिसोर्सेस आणि जॅक्सन काउंटी शेरिफ कार्यालय यूएस कोस्ट गार्डला मदत करत आहेत.

Comments are closed.