ऐश्वर्या राय बच्चन हिचा कान्स फिल्म फेस्टिवल मधील लुक चर्चेत, अभिनेत्रीच्या शानदार एन्ट्री, चाहते गेले भारावून – Tezzbuzz
सध्या कान्स फेस्टिवल सुरू आहे आणि अनेक कलाकार तिथे जाऊन येत आहेत मात्र अनेक जणांना ऐश्वर्या राय तिथे जाण्याची आणि तिथे तिला पाहण्याची वाट पाहत होते तर आता तो क्षण आला आहे. ऐश्वर्या राय आता या फेस्टीवल ला पोहचली आहे. आणि तेथील तिचे काही फोटो आणि व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहेत. ऐश्वर्याने तिच्या रेड कार्पेट लूकने सर्वांना थक्क केले. ही अभिनेत्री एका आकर्षक निळ्या रंगाच्या गाऊनमध्ये अत्यंत सुंदर दिसत होती आणि तिने रेड कार्पेटवर आपली चमक दाखवली. ज्या क्षणी तिने रेड कार्पेटवर पाऊल ठेवले, त्या क्षणी सर्वांची नजर तिच्यावर खिळली.
ऐश्वर्या (aishwrya)राय हिचा या रेड कार्पेटवरील लूक पाहण्यासाठी लोक पहिल्या दिवसापासुन आतुर होते. ऐश्वर्या राय बच्चनला ‘कान्स क्वीन’ म्हणूनही ओळखले जाते. तर या वेळी आलीया भट्ट, जॅकलिन फर्नांडिस, आश्या अनेक कलाकारांनी कान्स 2026 मध्ये आपले लूक्स आधीच सादर केले आहेत. पण ऐश्वर्या रायचा लुक पाहण्यासाठी चाहते खुप आतुर होते. आणि ते पुर्ण झाले आहे. आणि या अभिनेत्री अतिशय सुंदर लुक येथे सादर केला होता.
ऐश्वर्या 2002 पासून कान्स चित्रपट महोत्सवात सहभागी होत आहे. आणि तेव्हापासून जवळपास दरवर्षी रेड कार्पेटवर आपल्या सौंदर्याने सर्वांना चकित करते. पण तिची स्टाईल मात्र तशीच राहिली आहे. यावेळीही, तिने कान्सच्या रेड कार्पेटवर आपल्या सिग्नेचर पोझमध्ये फोटो काढून घेतले. आणि तिच्या या लुक ने तिने प्रेक्षकांची मने जिंकुन घेतली आहेत.
या अभिनेत्याने एका चित्रपटासाठी 3 वेळा बदलली बॉडी; पहलवानाचा लूक पाहून चाहतेही झाले थक्क
Comments are closed.