भंडारा – गोंदिया विधान परिषद जागा वाटपाचा तिढा कायम; भाजपसह, राष्ट्रवादीनंही शड्डू ठोकला
विधान परिषद निवडणूक 2026: भंडारा – गोंदिया विधान परिषद निवडणुकीसाठी (Bhandara – Gondia Vidhan Parishad Election 2026) उमेदवारी मिळावी, यासाठी अनेकांनी त्यांच्या पक्ष श्रेष्ठींकडे दावेदारी केली आहे. तब्बल साडेतीन वर्षानंतर होत असलेल्या या निवडणुकीकडे सर्वांच्या नजरा लागल्या असल्या तरी उमेदवारी कुणाला द्यायची याबाबत अद्यापही तिढा सुटलेला नाही. 457 मतदारांपैकी 220 पेक्षा अधिक मतदार भाजपाचे (BJP) असल्याचा दावा भाजपकडून करण्यात येत आहे. भाजपचा हा दावा असला तरी, राज्यात सत्ताधारी असलेल्या भाजपसमोर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनेही (Congress) शड्डू ठोकल आहे. ही जागा भाजपचं लढेल आणि ज्यांनी पक्ष वाढीसाठी मेहनत केली, अशा सर्वसामान्य कार्यकर्त्याला उमेदवारी दिली जाईल, असा निर्णय झाला असून इतर पक्षातून आलेल्यांना उमेदवारी देण्यात येणार नाही, असा निर्णय झाल्याची माहिती भाजप नेते परिणय फुके (Parinay Fuke) यांनी दिलीय.
तर, अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार राजेंद्र जैन आणि भंडाऱ्याचे सहकार महर्षी सुनील फुंडे यांनी निवडणुकीची तयारी केली असून उमेदवारी मिळविण्यासाठी पक्षाकडे मागणी केली आहे. तर, ही निवडणूक काँग्रेस नाही प्रतिष्ठेची केली असून काँग्रेस नेते नाना पटोले (Nana Patole) यांनी, ही निवडणूक काँग्रेस लढेल आणि जिंकेल, असा दावा केला आहे.
Nana Patole: काँग्रेसकडे संख्याबळ नसतानाही काँग्रेस लढेल आणि जिंकेल, नाना पटोले यांचा दावा
संख्याबळाचा विचार करता काँग्रेसकडे संख्याबळ नसतानाही नाना पटोले यांनी केलेला हा दावा राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे. मात्र, ज्यावेळेस नाना पटोले भाजपात होते आणि त्यावेळी भाजपकडे संख्याबळ नसतानाही नाना पटोले यांनी परिणय फुकेंना जिंकवून आणण्यात कमाल केली होती. तसाच काही चमत्कार नाना पटोले या निवडणुकीत काँग्रेससाठी करणार का? याकडे आता भंडारा – गोंदिया जिल्ह्यातील नागरिकांच्या नजर लागल्या आहेत.
अमरावतीत्यामुळे भाजपचे प्रवीण पोटे यांच्यासह नितीन धांडे इच्छूक, काँग्रेसकडून ऐनवेळी मोठी घोषणा? (Amravati Vidhan Parishad Election)
अमरावती विधान परिषद निवडणूकसाठी सध्या प्रवीण पोटे यांच्यासह शहर जिल्हाध्यक्ष नितीन धांडे हे भाजप कडून इच्छूक आहे. मात्र राणा दाम्पत्यांचं प्रवीण पोटे यांना विरोध आहे. तर काँग्रेसकडून ऐनवेळी मोठी घोषणा होऊ शकते, अशी चर्चा आहे. पोटे यांना टक्कर द्यायची असेल तर यशोमती ठाकूर यांनी निवडणूक लढावी, अशी चर्चा अमरावतीत सुरू आहे. तर प्रवीण पोटे यांना पराभूत करण्यासाठी आमदार रवी राणा यांची फोनवरून अनेक नेत्यांशी बोलणी सुरू असल्याची माहिती आहे. रवी राणा हे त्यांचे भाऊ सुनील राणा यांना मैदानात उतरवणार अशी चर्चा असून राणा हे काँग्रेसच्या नेत्यांसोबत ही चर्चा करत असल्याची माहिती आहे. तर शिवसेनेचे अकोला येथील माजी आमदार गोपिकीशन बाजोरिया हे देखील अपक्ष किंवा काँग्रेस कडून निवडणूक लढू शकतात अशी पण चर्चा आहे.
अमरावती विधान परिषदची जागा महायुतीसाठी पूर्णपणे सेफ?
सध्या अमरावती विधान परिषदची जागा ही महायुतीसाठी पूर्णपणे सेफ झोनमध्ये आहे. एकूण 453 मतदारांपैकी जवळपास 248 मते महायुतीकडे आहे. पण छोटे घटक पक्ष काय भूमिका घेतात याकडं सर्वांचे लक्ष लागले आहे. तर महाविकास आघाडीकडे जवळपास 152 चा आकडा आहे. 53 मतदार हे अपक्ष आणि अन्य पक्षाचे आहेत.
आणखी वाचा
Comments are closed.