सोशल मीडियावर चर्चांना उधाण; मालती चाहरच्या प्रतिक्रियेनंतर प्रणीत मोरे पुन्हा चर्चेत आला – Tezzbuzz
प्रणीत मोरे हा एक लोकप्रिय स्टँड-अप कॉमेडियन आहे. तसेच तो ‘बिग बॉस 19’चा माजी स्पर्धक हि आहे. या ‘बिग बॉस 19’ नंतर त्याला जास्त प्रसिध्दी मिळाली आहे. पण तो आता त्यांच्या शो दरम्यानच्या एका वक्तव्यामुळे तो चर्चेत आला आहे, आणि तो आता वादात सापडला आहे. तसेच त्याने त्याचे इंस्टाग्राम खाते डिलीट केले आहे. आणि सोशल मिडीयावर त्याला आता प्रंचड ट्रोल केले जात आहे. याच दरम्यान आता मालतीने ही यावर भाष्य केले आहे. मालतीने प्रणीतला फटकारल्यामुळे चाहत्यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे, काहींनी तर याला ‘बिग बॉस १९’मधील त्यांच्यातील वादामुळे घेतलेला बदला असेही म्हटले आहे.
मालतीने एक्स वर प्ररणीतबाबत निराशा व्यक्त केली आहे. लोकांना अजूनही असे वाटते की एका महिलेच्या संमतीपेक्षा ‘बिर्याणीची प्लेट’ अधिक महत्त्वाची आहे, ही बाब अत्यंत खेदजनक आहे. संदर्भासाठी सांगायचे तर, प्रणीत मोरेच्या अलीकडील एका स्टँड-अप शोमधील व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्यावर ऑनलाइन मोठी टीका झाली. या क्लिपमध्ये, 23 वर्षीय हिमांशू जांगरा याने ‘डेट’वर असताना चिकन बिर्याणीच्या प्लेटसाठी 370 रुपये खर्च केल्याचा उल्लेख केला आणि त्या गुंतवणुकीचा ‘परतावा’ मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली. त्याच्या या विधानामुळे सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटली आणि लोकांनी प्रणीत व हिमांशू या दोघांवरही टीका केली.
प्रणीत (pranit)मोरे यांच्या या शो मधील घडलेल्या प्रंसागामुळे आता त्याच्या विरोधात fir दाखल करण्यात आली आहे. तसेच आता सोशल मिडियावर अनेक प्रकारे प्रणीतला सर्व वादाला सोमोरे जावे लागत आहे.
‘Alpha’च्या टीझरने जिंकली मनं; आलिया भट्टच्या दमदार अंदाजाला चाहत्यांची दाद
Comments are closed.