‘नागिन 7’मध्ये मोठी चूक, एडिट न केलेला VFX सीन झाला टेलिकास्ट – Tezzbuzz

एकता कपूर हि एक लोकप्रिय निर्माती आहे. तीने आता पर्यत अनेक चित्रपट आणि मालिका निर्माण केल्या आहेत. तसेच त्या गाजल्या देखील आहेत. आणि आजही प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत. तर एकता कपूरची एक नावाजलेली मालिका म्हणजे  ‘नागिन 7’. हा सातवा सीझन सतत चर्चेत आहे. नुकतेच काही दिवसांनपुर्वी या मालिकेत  ai वापरुन दाखवलेल्या ड्रॅगनच्या चित्रणावरून प्रेक्षकांनी या मालिकेला ट्रोल केले होते. तर आता एका मोठ्या तांत्रिक चुकीमुळे ही अलौकिक मालिका चर्चेत आली आहे. प्रियांका चहर चौधरी अभिनीत मालिकेच्या अलीकडील एपिसोडमध्ये एक मोठी चूक झाली, ज्यामुळे प्रेक्षक आश्चर्यचकित झाले आहेत. अनेक सोशल मीडिया वापरकर्त्यांनी ‘नागिन ७’ मधील एक सीन शेअर करून निर्मात्यांची चुक दाखवुन दिली आहे.

‘नागिन 7’ च्या अलीकडील एका एपिसोडमधील एक सीन सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा एक ॲक्शन सीन आहे, ज्यामध्ये निर्माते पार्श्वभूमीतून ‘ब्लू स्क्रीन’ किंवा क्रोमा काढायला विसरले. ‘नागीन 7′ (naagin)चा हा व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरला आहे. तो पाहिल्यानंतर, अनेक वापरकर्त्यांनी प्रोडक्शन आणि एडिटिंग टीमवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यास सुरुवात केली.

एका रवीवारच्या भागात ‘ब्लू स्क्रीन’ किंवा क्रोमा काढायला एडिटर विसरले.  आणि हा भाग प्रसारीत झाल्यानंतर आता नेटकारी काय प्रकार.. म्हणत आहेत. तर निर्मात्यांची ही चूक प्रेक्षकांच्या लक्षात आली आणि त्यांनी सोशल मीडियावर हा व्हिडिओ शेअर करून त्याची खिल्ली उडवायला सुरुवात केली.  तर आता या मालीकेची सोशल मिडियावर जोरदार चर्चा सुरु आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

सलमान खान सोबत चित्रपटात दिसणार करीना? राज आणि डीके तयार करत आहेत भन्नाट कथा

Comments are closed.