‘स्त्री 2’ नंतर श्रद्धा कपूरचा मोठा धमाका; ‘ईथा’ या चित्रपटाची पहिली झलक आली समोर – Tezzbuzz

श्रद्धा कपूर ही एक लोकप्रिय अभिनेत्री आहे तिने आतापर्यंत अनेक उत्तम चित्रपट केले आणि काही दिवसांपासून ती जरी सक्रिय दिसली नसली तरी सोशल मीडिया वरती नेहमीच सक्रिय असते आणि आता सध्या ती एका तिच्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. प्रेक्षकांना सुद्धा कॉकटेल टू या चित्रपटाची भुरळ चढली असतानाच यामध्ये सोशल मीडियावर सध्या श्रद्धा कपूरच्या ‘ईथा’ या चित्रपटाच्या टीझरचे व्हिडिओ क्लिप्सने धुमाकूळ घातलेला आहे. प्रेक्षकांना हे टीझरचे व्हिडिओ क्लिप्स खुप आवडले आहेत.

शुक्रवारी काही निवडक चित्रपटगृहांमध्ये ‘कॉकटेल’सोबत दाखवण्यात आलेल्या  ‘ईथा’ चित्रपटच्या टीझरचे व्हिडिओ क्लिप्स सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाले. या सोशल मिडीयावर व्हायरल होत असलेल्या क्लिप मध्ये श्रद्धा एका अशा अवतारात दिसत आहे जो तिने यापूर्वी कधीही साकारलेला नाही. पारंपरिक महाराष्ट्रीयन साडी परिधान केलेली श्रद्धा यात गरोदर असल्याचे दाखवले आहे; टीझरची सुरुवातच तिच्या प्रसूती वेदनेतील आर्त किंकाळीने होते. त्यानंतरच्या दृश्यांमध्ये ती एक स्टेज परफॉर्मर आणि लोककलाकार म्हणून दिसते, ज्यामुळे चित्रपटातील भावनिक आणि नाट्यमय प्रवासाची झलक मिळते.

आता सोशल मिडियावर तिचे आणि त्याच्या लुकचे प्रचंड काैतुक सुरु आहे. एका युजरने लिहिले, “तिने कमाल केली आहे! #Eetha , दुसऱ्या एका युजरने पोस्ट केले, “तिची देहबोली आणि पडद्यावरील उपस्थिती अत्यंत प्रभावी आहे. कौतुक (shrddha)कपूरची भेदक नजर या भूमिकेच्या प्रत्येक पैलूला न्याय देते. तिसऱ्या युजरने कमेंट केली, “ही क्लिप पाहिल्यानंतरही जर कोणी श्रद्धाच्या अभिनयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले, तर मला त्यांच्या निर्णयक्षमतेबद्दल नक्कीच शंका वाटेल.” हा चित्रपट या वर्षाच्या अखेरीस किंवा पुढील वर्षी प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.

कबड्डी चॅम्पियन ते गुन्हेगार; ‘लिंगम’मध्ये कथिरचा रौद्र अवतार, प्रत्येक मालीकेच्या भागात मिळेल थरारक अनुभव

Comments are closed.