एकनाथ शिंदे कर्णा सारखे दानशूर, शरद पवारांचा आमदार शिंदेंच्या प्रेमात

सोलापूर: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माळशिरसचे आमदार उत्तम जानकर (Uttam Jankar) यांनी आज पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर भाषणात तोंड भरुन स्तुती केली आहे. काही दिवसांपूर्वी उत्तम जानकर हे एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी थेट पंढरपूरला येऊन प्रत्येक कार्यक्रमात हजेरी लावत होते. आज होलार समाजाच्या मेळाव्यात शिंदे सेनेचे दोन मंत्री स्टेजवर असताना चक्क त्यांच्यासमोरच जानकर यांनी शिंदेंवर स्तुती सुमने उधळण्यास सुरुवात केल्याने पुन्हा नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे. जानकर यांची आमदारकी सध्या त्यांच्या जात प्रमाणपत्रामुळे अडचणीत आली असताना वारंवार त्यांना आलेले शिंदे प्रेमाचे भरती चर्चेचा विषय ठरु लागली आहे.

मी 40 वर्षाच्या राजकारणात खूप माणसं पाहिली पण एकनाथ शिंदे…

मी 40 वर्षाच्या राजकारणात खूप माणसं पाहिली. पण एकनाथ शिंदे यांच्यासारखा माणूस वेगळा आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणजे कर्णा सारखे दानशूर माणूस आहे, अशा शब्दात आमदार जानकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची स्तुती केली. यावेळी शिवसेना शिंदे गटाचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट व फलोत्पादन मंत्री भरत शेठ गोगावले स्टेजवर उपस्थित होते. याच स्टेजवर त्यांचे कट्टर विरोधक असणारे भाजपचे माजी आमदार राम सातपुते असताना त्यांच्यासमोरच एकनाथ शिंदे यांची केलेली स्तुती वेगळा संदेश देत होती .

कट्टर विरोधक होलार समाजाच्या कार्यक्रमानिमित्ताने व्यासपीठावर एकत्र

सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यामध्ये सतत राजकीय वातावरण गरम असते. मोहिते पाटील आणि माजी आमदार राम सातपुते (Ram Satpute)  यांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या काळात ऐकमेकांवर टीका केल्याची पाहायला मिळालं होतं. त्यानंतर आज माळशिरस तालुक्याचे आमदार उत्तमराव जानकर (Uttamrao Jankar), आमदार रणजितसिंह मोहिते पाटील (Ranjitsinh Mohite Patil) तसेच माजी आमदार राम सातपुते हे एकाच व्यासपीठावर आल्याचं पाहायला मिळालं. होलार समाजाच्या कार्यक्रमानिमित्ताने ते एकत्र आल्याचं पाहायला मिळालं. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये एकमेकांच्या विरोधात अनेक भाष्य करुन राजकीय वातावरण गरम झाले होते. त्याचबरोबर आगामी काळात राज्यातील जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका महानगरपालिका या निवडणुका होत आहेत. त्या निवडणुकांमध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणत्याही प्रकारचे राजकारण न आणता या निवडणुका पार पाडण्याचे आदेश सर्व आमदार खासदार आणि पक्षातील कार्यकर्त्यांना दिले आहेत. त्यामुळेच या ठिकाणी कार्यक्रमाला हे तिन्ही आमदार एकत्र पाहायला मिळाल्याची चर्चा सुरु आहे.

महत्वाच्या बातम्या:

विधानसभेला टोकाचा विरोध! आता कट्टर विरोधक एकाच व्यासपीठावर, माळशिरसमध्ये नेमकं काय घडलं?

आणखी वाचा

Comments are closed.