बॅटमध्ये AI चिप… पाकिस्तानी एक्सपर्टची जळफळाट; वैभव सूर्यवंशीने एका वाक्यातच विषय संपवला, नेम
वैभव सूर्यवंशी बॅट एआय चिप : सोशल मीडियावर सध्या षटकार-चौकारांचा पाऊस पाडणारा युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी जबरदस्त चर्चेत आहे. अशातच त्याचा एक मजेशीर व्हिडिओ इन्स्टाग्रामवर तुफान व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो अत्यंत शांत आणि खुमासदार शैलीत पाकिस्तानी क्रिकेट एक्स्पर्टची बोलती बंद करताना दिसतो.
बॅटमध्ये ‘AI चिप’ची चर्चा…
खरं तर, एका रीलमध्ये वैभवला असा प्रश्न विचारण्यात आला, जो पाकिस्तानी शोमध्ये एक्स्पर्ट नौमान नियाझ यांनी उपस्थित केला होता. नियाझ म्हणाले की, “या मुलाची बॅट तपासायला हवी. जशी WADA खेळाडूंची उत्तेजक चाचणी करते, तशी याच्या बॅटची लॅबमध्ये चाचणी करा. कदाचित त्याने बॅटमध्ये एखादी ‘AI चिप’ (AI Chip) वापरली असावी, कारण तो जे करतोय ते अवास्तव आहे.”
नियाझ पुढे म्हणाले, “जेव्हा तुम्ही 18 वर्षांचे असता, तेव्हा तुमचे शरीर स्नायू बनवते. पण हा मुलगा तर फक्त 15-16 वर्षांचा आहे. जेव्हा विराट कोहली विश्वविजेता बनला होता, तेव्हा याचा जन्म झाला होता. त्याच्याकडे फक्त ताकद नाही, तर अप्रतिम तंत्र आहे. तो 260 डिग्री कोनात फटकेबाजी करणारा एक खेळाडू आहे.”
🚨 वैभव सूर्यवंशीच्या बॅटमध्ये AI चिप?
– वैभव सूर्यवंशी AI चिप बसवल्याप्रमाणे फलंदाजी करत आहे. खरे सांगायचे तर, जशी आमची डोपिंग चाचणी होते, तशीच त्याचीही चाचणी व्हायला हवी. हे मानवी दिसत नाही. किती खेळाडू आहे तो!! अवास्तव! – डॉ नौमन नियाज #TATAIPL #RRvsSRH #IPL2026 pic.twitter.com/xUZ4eg2iyU
— तहसीन कासिम (@Tehseenqasim) 26 एप्रिल 2026
“देवानेच बसवली आहे चिप!”
राजस्थान रॉयल्सच्या अधिकृत X अकाउंटवर शेअर करण्यात आलेल्या या व्हिडिओमध्ये वैभव म्हणतो, “देवानेच लावून दिली आहे. वरच सांगितलं होतं की, बॅटमध्ये काहीतरी खास देतोय… त्याचाच वापर करतोय…” त्याचा हा निरागस, विनोदी आणि आत्मविश्वासाने भरलेला प्रतिसाद चाहत्यांच्या मनात घर करून गेला आहे.
?
वैभव उत्तर देतो???💗 pic.twitter.com/uZcqABbaGS
— राजस्थान रॉयल्स (@rajasthanroyals) 29 एप्रिल 2026
व्हिडिओ व्हायरल, फॅन्स खुश!
हा व्हिडिओ केवळ मजेशीर नाही, तर वैभवच्या साधेपणाचा आणि नैसर्गिक टॅलेंटचा उत्कृष्ट नमुना म्हणून पाहिला जात आहे. काहींनी याला ‘देसी ह्यूमर’चं भन्नाट उदाहरण म्हटलं, तर काहींनी राजस्थान रॉयल्सच्या सोशल मीडिया टीमचं क्रिएटिव्ह काम असल्याचं म्हटलं.
मैदानातही धडाकेबाज कामगिरी
आयपीएल 2026 हंगामात वैभव फक्त सोशल मीडियावरच नाही, तर मैदानावरही तुफान फॉर्ममध्ये आहे. 9 सामन्यांत 9 डाव खेळत त्याने 44.44 च्या सरासरीने आणि 238.10 च्या स्ट्राइक रेटने तब्बल 400 धावा केल्या आहेत. यामध्ये 36 चेंडूंमध्ये झळकावलेलं शतक आणि 2 अर्धशतकांचा समावेश आहे. सध्या ऑरेंज कॅपही त्याच्याकडेच आहे. एकूणच, वैभव सूर्यवंशीचं नाव आता फक्त क्रिकेटपुरतं मर्यादित राहिलेलं नाही, तर त्याचा आत्मविश्वास, हजरजबाबीपणा आणि भन्नाट खेळ यामुळे तो चाहत्यांचा नवा फेव्हरेट बनत चाललाय.
हे ही वाचा –
आणखी वाचा
Comments are closed.