वैभव सूर्यवंशीची 10 वीच्या बोर्ड परीक्षेला दांडी; प्रिंसिपल सिन्हांनी स्पष्टच सांगितलं

टीम इंडियाच्या अंडर 19 संघातील तडाखेबंद फलंदाज वैभव सूर्यवंशी आपल्या वादळी खेळीने देशभरात चर्चेत आहे. गोलंदाजांवर तुटून पडणाऱ्या या फलंदाजाने कमी वयातच आपल्या तुफानी फलंदाजीने क्रिकेट चाहत्यांचे लक्ष वेधले. यंदाच्या वर्षी इयत्ता 10 वीमध्ये (SSC exam) शिकणाऱ्या वैभवने नुकतेच अंडर 19 वर्ल्ड कप स्पर्धेत शानदार कामगिरी बजावत भारताला विश्वचषक मिळवून दिला. मात्र, यंदाच्या वर्षी होत असलेल्या 10 वीच्या परीक्षेला वैभवने दांडी मारली. त्यावरुन, आता वैभवची 10 वीची परीक्षा असलेल्या स्कुलच्या प्रिंसिपल सिन्हा यांनी याबाबत माहिती दिली. सध्या तो विविध क्रिकेट टुर्नामेंट, आयपीएलमध्ये (IPL) बिझी असल्याने त्याने परीक्षा दिली नसावी. मात्र, तो गैरहजर असल्याने त्याची परीक्षेला अनुपस्थिती दर्शवली आहे, असे सिन्हा यांनी सांगितले.

वैभव सूर्यवंशी आज परीक्षेसाठी आला नाही, तो गैरहजर असल्याने आम्ही सीबीएससीच्या पॉलिसीनुसार त्याची गैरहजेरी लावली. आम्हाला त्यांच्याकडून अधिकृत काही माहिती आली नाही, आणि आली तरीही एखादा विद्यार्थी परीक्षेला गैरहजर राहिल्यानंतर त्यांची गैरहेजरी लावण्यात येते, असे पोद्दार इंटरनॅशनल स्कूलचे प्रिंसिपल एन.के.सिन्हा यांनी म्हटले. आम्हाला अपेक्षा होती की, वैभवने 10 वीच्या परीक्षेला यावे आणि परीक्षा द्यावी. क्रिकेट टुर्नामेंटमुळे तो सध्या व्यस्त असेल, पण पुढच्या वेळेस तो 10 वीची परीक्षा देईल, अशी अपेक्षा देखील सिन्हा यांनी व्यक्त केली.

वैभव सूर्यवंशी हा बिहारच्या ताजपपूरमधील रहिवासी आहे. मॉडेस्टी स्कूलमध्ये तो शिक्षण घेतोय. वैभव सूर्यवंशी दहावीला असून त्याची परीक्षा आज 17 फेब्रुवारीपासून सुरु होणार असून 11 मार्चला संपणार आहे. मात्र, वैभवने पहिल्याच दिवशी परीक्षेला दांडी मारल्याने तो परीक्षा देणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. 2025 मध्ये वैभव सूर्यवंशीनं  भारताकडून अंडर 19 क्रिकेट वर्ल्ड कप आणि भारत अ संघाकडून क्रिकेट खेळलं आहे, ज्यामुळं त्याला दहावीच्या परीक्षेच्या तयारीसाठी कमी वेळ मिळाल्याची माहिती आहे.

वैभव सध्या आयपीएलच्या तयारीत

वैभवचे प्रशिक्षक मनीष ओझा यांनी हिंदूस्थान टाइम्स सोबत बोलताना म्हटले की, वैभव दहावीची परीक्षा देणार नाही. तो सध्या नागपूरमध्ये असून आगामी आयपीएलची तयारी करत आहेत. राजस्थान रॉयल्सच्या संघासोबत तो असून प्री सीझन कॅम्पमध्ये सहभागी झालाय. आयपीएल 26 मार्च 2026 पासून सुरु होणार आहे. वैभव सूर्यवंशी राजस्थान रॉयल्सकडून खेळत असून तो महत्त्वाचा फलंदाज आहे.

हेही वाचा

इमरान खान यांच्यासाठी एकवटले माजी कर्णधार, कपिल देव, सुनील गावस्कर यांच्यासह 14 दिग्गजांचं पाकिस्तान सरकारला पत्र

आणखी वाचा

Comments are closed.