‘आम्ही क्लासवरून आलो, मी उतरलो, दादा गाडी लावायला गेला अन् त्यांनी दादावर…’, आयुषच्या लहान भा
पुणे : माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या खुनाचा बदला घेण्यासाठी आंदेकर टोळीतील सराइतांनी प्रतिस्पर्धी गणेश कोमकर याचा मुलगा आयुषवर ११ गोळ्या झाडल्याचे तपासात समोर आले. त्यापैकी नऊ गोळ्या आयुषच्या शरीरात घुसल्याची माहिती पोलिसांनी न्यायालयात दिली. या प्रकरणी अटक केलेल्या दोन आरोपींना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी प्राजक्ता आपटे यांनी १२ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. लहान भावाला शिकवणीवरून घरी आणणाऱ्या आयुषवर नाना पेठेतील लक्ष्मी कॉम्प्लेक्समध्ये दबा धरून बसलेल्या यश पाटील आणि अमन पठाण यांनी पिस्तुलातून गोळीबार केला. या प्रकरणी यश सिद्धेश्वर पाटील (१९) आणि अमित प्रकाश पाटोळे (१९, रा. नाना पेठ) यांना पोलिसांनी अटक केली. आयुषची आई कल्याणी गणेश कोमकर (३७, रा. लक्ष्मी कॉम्प्लेक्स, नाना पेठ) यांनी समर्थ पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. आयुषच्या हत्येवेळी तिथे उपस्थित असलेला एकमेव साक्षीदार आहे, तो म्हणजे आयुषचा १२ वर्षाचा लहान भाऊ. आयुष त्या लहान भावाला ट्युशनवरून घेऊन आला होता, त्यावेळी घराच्या खाली पार्किंगमध्येच गोळ्या झाडल्याची माहिती समोर आली आहे.
आयुष कोमकरची आई कल्याणी गणेश कोमकरने या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. आयुषची आई कल्याणीने दिलेल्या माहितीनुसार, आयुषचा एक लहान भाऊ आहे, त्याचे नाव अर्णव आहे. आर्णव रोज संध्याकाळी कॅम्पमध्ये सलीम सरांकडे ट्युशनला जातो, त्याची ट्युशन घरापासून लांब असल्याने आयुष संध्याकाळी भावाला घेण्यासाठी गेला होता. घराच्या खाली आल्यानंतर आयुष पार्किंगमध्ये गाडी लावत असताना दबा धरून बसलेल्या दोन जणांनी त्याच्यावरती गोळ्या झाडल्या. आयुषवर ११ गोळ्या झाडल्याचे तपासात समोर आले. त्यापैकी नऊ गोळ्या आयुषच्या शरीरात घुसल्याची माहिती पोलिसांनी न्यायालयात दिली.
आयुषच्या लहान भावाने सांगितला तो थरारक प्रसंग?
आयुषच्या लहान भावाने त्या घटनेबाबत दिलेल्या माहितीनुसार, दादा आणि मी ट्युशन सुटल्यानंतर गाडीवरून आलो, पार्किंगमध्ये आल्यावर मी गाडीवरुन खाली उतरलो आणि दादाने गाडी पार्क केली. तेवढ्यात पाठीमागून दोन मुलं पळत आली आणि त्यांनी माझ्या दादावर समोरून गोळ्या झाडल्या. त्यानंतर दादा खाली पडला, अशी माहिती आयुषचा लहान भाऊ अर्णव याने दिली आहे. यासंबंधीचे वृत्त एका वृत्तसंस्थेने दिले आहे.
गोळीबारानंतर पार्किंगमध्ये मोठी गर्दी
आयुषवर गोळ्या झाडल्यानंतर पार्किंगमध्ये आजुबाजूच्या लोकांची मोठी गर्दी जमली होती. इमारतीतील एका व्यक्तीने आयुषच्या आईला फोन करून मुलाला कोणीतरी मारहाण केली असे सांगितले. आयुषची आई फोननंतर खाली आली, तर लहान मुलगा अर्णव रडत होता तर मोठा मुलगा आयुष रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. त्यानंतर जवळच्या डॉक्टरांना तपासणी केली आणि रक्तस्त्राव मोठ्या प्रमाणावर होत असल्याने त्याला ससून रुग्णालयात नेण्यास सांगितले. ससूनमध्ये गेल्यानंतर डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले.
मागील वर्षी १ सप्टेंबरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा माजी नगरसेवक वनराज आंदेकर याची गोळ्या घालून आणि कोयत्याने वार करून हत्या करण्यात आली होती, याच हत्येचा बदला आयुषच्या खुनाद्वारे घेण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी गणेश कोमकरचा मुलगा आयुष हा नाना पेठेतील एका सोसायटीत राहायला होता. शुक्रवारी 5 सप्टेंबरला सायंकाळी 8 वाजेच्या सुमारास तो दुचाकीवरून लक्ष्मी कॉम्प्लेक्स सोसायटीत आलेला. तो तळमजल्यावर दुचाकी लावत होता, त्या वेळी दबा धरून बसलेल्या अमन खान, यश पाटील यांनी त्याच्यावर 11 गोळ्या झाडल्या..आयुषच्या खुनाचा कट बंडुअण्णा आंदेकर आणि इतर आरोपींनी रचल्याचं कल्याणी कोमकरचं यांनी फिर्यादीत म्हटलं आहे.
बंडू आंदेकरसह सहा जणांना अटक
आयुष कोमकर हत्या प्रकरणात आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकरसह सहा जणांना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने काल रात्री उशीरा अटक केल्याची माहिती समोर आली आहे. बुलढाणा या ठिकाणी पळून जात असताना गुन्हे शाखेच्या पथकाने त्यांना अटक केली आहे. यात बंडू आंदेकरची मुलगी आणि दोन नातू ही असल्याची माहिती समोर आली आहे.
नेमकं प्रकरण काय?
दरम्यान मागील वर्षी एक सप्टेंबर रोजी माजी नगरसेवक वनराज आंदेकर याचा गोळ्या झाडून आणि कोयत्याने वार करून खून करण्यात आला होता. या प्रकरणात सोमनाथ गायकवाड, अनिकेत दूधभाते, वनराज आंदेकर याची बहीण संजीवनी कोमकर, पती जयंत कोमकर आणि दीर गणेश कोमकर यांच्यासह १६ आरोपींना अटक करण्यात आली होती. या प्रकरणाचा बदला या खुनाद्वारे घेण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी गणेश कोमकरचा मुलगा आयुष नाना पेठेतील एका सोसायटीत राहायला होता. शुक्रवारी (५ सप्टेंबर) सायंकाळी आठ वाजण्याच्या सुमारास तो क्लासवरून दुचाकीवरून आला त्यावेळी पार्किंगमध्ये त्याच्यावरती गोळ्या झाडण्यात आल्या.
आणखी वाचा
Comments are closed.