समाज तोडणाऱ्यांसोबत जाऊ शकत नाही, मुंबईत जो काम करेल तोच निवडून येईल : वर्षा गायकवाड
मुंबई : ठाकरे बंधूंनी आम्हाला विचारात न घेता युती केली, युती करताना आमच्यासोबत त्यांनी कोणतीही चर्चा केली नसल्याचा दावा काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी केला. समाजातील दरी दूर झाली पाहिजे म्हणून आम्ही जोडणारे आहोत, त्यामुळे आम्ही तोडणाऱ्यांच्या सोबत जाऊ शकत नाही असं वर्षा गायकवाड(वर्षा गायकवाड) म्हणाल्या. एबीपी माझाच्या संपादक सरिता कौशिक यांच्या कॉफी विथ कौशिक या पॉडकास्टमध्ये त्या बोलत होत्या.
मुंबईत मविआची शकलं उडालेली असतानाच आता काँग्रेस प्रकाश आंबेडकरांची वंचित, गवई गट आणि रासपसोबत जाण्याच्या प्रयत्नात आहे. या तिन्ही गटांसोबत काँग्रेसची आघाडी जवळपास निश्चित झाल्याचं वर्षा गायकवाडांनी सांगतिलं.
Varsha Gaikwad Podcast : आमच्यासाठी विचारधारा महत्त्वाची
ठाकरे यांची युती होणार हे माहीत होतं. त्यांची चर्चा ही सुरु होती. इतर पक्षांप्रमाणे त्यांनाही शुभेच्छा देते. त्यांनी त्यांच्या पक्षाच्या माध्यमातून लढावं. आम्ही स्वबळाचा नारा दिला आहे. आमच्यासाठी विचारधारा महत्त्वाची आहे असं वर्षा गायकवाड म्हणाल्या. समाज तोडणारे आम्ही आहोत, त्यामुळे समाज तोडणाऱ्यांसोबत आम्ही जाणार नाही असं वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केलं.
Varsha Gaikwad On BMC Election : कार्यकर्त्यांशी चर्चा करूनच निर्णय
वर्षा गायकवाड म्हणाल्या की, “ही निवडणूक कार्यकर्त्यांची आहे. आरपीआय आणि इतर पक्षांच्या सोबत आम्ही चर्चा करत आहोत. ठाकरे गटाची आमच्या सोबत काहीही चर्चा झाली नाही. महाविकास आघाडी आणि इंडिया अलायन्स निर्माण झाली याचा मुख्य गाभा हा संविधान होता. खरगे साहेबांसोबत आमची चर्चा झाली होती, त्यासाठी आम्ही दिल्लीला गेलो होतो. त्यावेळी आम्ही कार्यकर्ते, पदाधिकारी या सर्वांच्या सोबत चर्चा केली आणि नंतर मुंबईत स्वबळाची घोषणा केली.“
Varsha Gaikwad On BJP: भाजकडून धार्मिक तेढ
भाजपकडून हिंदू मुस्लिम मुद्दा करून समाजात फुट पाडण्याचं काम सुरू असल्याचा आरोप वर्षा गायकवाड यांनी केला. त्या म्हणाल्या की, “आम्हाला समाजात फुट पाडण्यापेक्षा समाजाला एक करायचं आहे. भाजपचे अमीत साटम हे मुंबई अध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी हिंदू-मुस्लिम सुरु केलं. पण मुंबई महापालिकेत अनेक प्रश्न आहेत, यावर का चर्चा होत नाही? धार्मिक विवाद बंद करुन विकासाचा मुद्दा समोर आणला पाहिजे.“
अभिनेत्रीच्या गालासारखे मुंबईतील रस्ते होतील असं एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना बोलले होते, आता काय अवस्था आहे? महापालिकेचा निधी तुम्ही पार्टी फंड म्हणून देता आणि लोकांना विकत घेऊन पक्षात घेता. मुंबईच्या बजेटपेक्षा जास्त टेंडर काढले असा आरोप वर्षा गायकवाड यांनी केला.
Varsha Gaikwad Interview : पवारांशी आघाडी होणार का?
पवारांच्या राष्ट्रवादीसोबत आघाडीसंबंधी बोलताना वर्षा गायकवाड म्हणाल्या की, “समविचारी पक्ष म्हणून आम्ही शरद पवार यांना भेटायला गेलो होतो. समविचारी पक्षाने एकत्र येऊन आघाडी केली पाहिजे अशी आमची भूमिका आहे असं वर्षा गायकवाड म्हणाल्या. राष्ट्रवादीने 50 टक्के जागा मागितल्या नाहीत. आमची त्यांच्या सोबत चर्चा सुरु आहे. त्याचवेळी जानकर, गवई यांच्यासोबत चर्चा झाली आहे. वंचित सोबत उद्यापर्यंत चर्चा होईल. 27 डिसेंबर पर्यंत आमची चर्चा करण्यासाठी डेडलाईन आहे.“
आम्ही जिंकलो तर मुंबईतील प्रदूषण, घनकचरा, बेस्टची व्यवस्था, वाहतुक कोंडी, आरोग्याचा प्रश्न, शिक्षण यावर आमचा फोकस असेल. मुंबईत जो काम करेल तो निवडून येईल असं वर्षा गायकवाड म्हणाल्या.
आणखी वाचा
Comments are closed.