भोंदू ऋषिकेश वैद्यचे आणखी विकृत कारनामे उघड; महिलेवर अत्याचारासोबतच सतत पाठवायचा अश्लील फोटो

Rishikesh Vaidya वसई : स्वतःला महादेवाचा अवतार सांगत महिलेवर अत्याचार केल्याच्या प्रकरणातील वसईतील (वसई गुन्हे) भोंदू बाबा ऋषिकेश वैद्य (Rishikesh Vaidya) याचा आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आरोपीने संबंधित महिलेला वारंवार अश्लील फोटो आणि व्हिडिओ पाठवून त्रास दिल्याचे उघड झाले असून, यासंदर्भातील महिलेच्या मोबाईलमधील स्क्रीनशॉटही समोर आले आहे. नाशिकच्या अशोक खरात या प्रकरणाने संपूर्ण राज्यभरात अंधश्रद्धेच्या बिळात लपलेल्या अनेक भोंदू बाबांचे कारनामे उघडकीस येत आहेत.  दरम्यान सध्या चर्चेत असलेल्या पुण्यातील नराधम बाबा ऋषिकेश वैद्य याच्याविरोधात आणखी धक्कादायक माहिती समोर येत आहे. त्यातच आता पीडितेने पोलिसांकडे दिलेल्या पुराव्यांमध्ये मोबाईलवरील स्क्रीनशॉटचा समावेश असून, त्यावरून आरोपीची विकृत मानसिकता स्पष्ट होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी महिलेवर मानसिक दबाव टाकत होता. आधीच अत्याचाराच्या घटनेमुळे त्रस्त असलेल्या पीडितेला तो सतत अश्लील मजकूर, फोटो आणि व्हिडिओ पाठवत असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकारामुळे पीडिता आणखी मानसिक तणावाखाली गेल्याचे समजते. पीडितेने पोलिसांकडे दिलेल्या पुराव्यांमध्ये मोबाईलवरील स्क्रीनशॉटचा समावेश असून, त्यावरून आरोपीची विकृत मानसिकता स्पष्ट होत आहे. स्वतःला धार्मिक स्वरूप देत महिलांची फसवणूक करणाऱ्या अशा भोंदू बाबांमुळे समाजात संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यानया प्रकरणी पुण्याच्या मांजरी पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून, आरोपीविरोधात कठोर कारवाईची मागणी जोर धरत आहे.

नेमकं प्रकरण काय? (Vasai Crime Rishikesh Vaidya Case)

पुणे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘मी महादेवाचा अवतार आहे, तू माझी पार्वती’ असं सांगत महिलेला लॉजवर नेऊन ऋषिकेश वैद्य या स्वयंघोषित बाबाने महिलेला अमली पदार्थ देत महिलेवर अत्याचार केला. महिलेने केलेल्या आरोपानुसार आरोपी तिला पुण्यातील मांजरी भागातील एका लॉजमध्ये घेऊन गेला होता. मादक पदार्थ देऊन नंतर तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोपही महिलेने केला. त्यानंतर भोंदू बाबाने महिलेचे फोटो काढले होते. यासंबंधीत प्रकरणाची सुरुवात वसईत झाली होती. पुढील तपासासाठी हे प्रकरण पुणे पोलिसांकडे वर्ग करण्यात आले होते. पुणे पोलिसांनी तपास करत पिंपरी भागातून ऋषिकेश वैद्यला अटक केली. ऋषिकेश वैद्य विषयी अनेक खळबळजनक  खुलासे समोर येत आहेत.

इतर महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

Comments are closed.