परभणी जिल्ह्यात भीषण अपघात, कारची समोरासमोर धडक; जागेवरच 3 ठार 2 जखमी


परभणी: राज्यात गेल्या काही महिन्यात रस्ते अपघाताच्या (Accident) घटनांमध्ये सातत्याने वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्यातच, परभणी जिल्ह्यातील वसमत तालुक्यात भीषण अपघाताची घटना घडली असून या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला. परभणी-वसमत राष्ट्रीय महामार्गावरील रहाटीजवळ स्विफ्ट आणि क्रेटा गाडीचा समोरासमोर अपघात झाला. या अपघातात वसमत (परभणी) तालुक्यातील 3 जणांचा मृत्यू झाला असून 2 जण जखमी झाले आहेत. दरम्यान, या मार्गावरील अपघातांची मालिका सुरुच असल्याचं दिसून येतं.

बाबाराव साखरे हे स्विफ्ट डिझायर कार क्रमांक – एमएच 38 एडी 3५४ या वाहनातून आरळ येथून परभणीच्या दिशेने येत असताना समोरून येत असलेली क्रेटा कार क्रमांक – एमएच 22 बीसी ८८८ च्या चालकाने निष्काळजीपणे आणि भरधाव वेगात कार चालवून समोरून जोरदार धडक दिली. या अपघातात बाबाराव दाताराव साखरे, बिमलबाई बाळासाहेब जाधव (रा. पिंगळी ता. परभणी) कांताबाई अंबादास कातोरे (रा. आरळ ता. वसमत) या तिघांचा घटनास्थळीच मृत्यूपू झाला असून त्यांच्या सोबतचे साईनाथ रामचंद्र काकडे, हरी बाळासाहेब जाधव हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत.

दरम्यान, अपघाताच्या घटनेनंतर स्थानिकांनीपोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मदत व बचावकार्य सुरू केले. अपघातातील जखमींना परभणी येथील अधिकृत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच ताडकळस पोलिसांचे सहाय्यक पोलिस निरीक्षक गजानन मोरे, यांच्या पथकाने घटनास्थळी भेट दिली. या प्रकरणी सखाराम सटवाजी साखरे रा. आरळ ता. वसमत यांच्या फिर्यादीवरून क्रेटा कार क्रमांक एमएच 22 बीसी ८८८ च्या चालकावर भारतीय न्याय संहिता कायद्याच्या लेख 06(), 2८१, २५(अ) आणदि २५(b) नुसार ताडकळस पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास ताडकळसचे ठाणेदार सहाय्यक पोलिस निरीक्षक गजानन मोरे हे करीत आहेत.

हेही वाचा

एकाच तालुक्यातील 85 ग्रामपंचायत सदस्यांना ठरवलं अपात्र, अपर जिल्हाधिकाऱ्यांचा नेतेमंडळींना दणका

आणखी वाचा

Comments are closed.