भुयारी मेट्रो स्थानकात विषारी घोणस, प्रवाशांसह कर्मचाऱ्यांची घाबरगुंडी

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

मेट्रो-3 अर्थात भुयारी मेट्रो मार्गिकेवरील वांद्रे-कुर्ला संकुल (बीकेसी) स्थानकाच्या तळघरात ‘घोणस’ जातीचा विषारी साप आढळल्याने मंगळवारी सकाळी प्रवाशांसह कर्मचाऱ्यांची घाबरगुंडी उडाली. जवळपास दोन ते अडीच फूट लांबीचा हा साप मेट्रो स्थानकात कसा आला, या प्रश्नाने सर्वजण चक्रावून गेले.

सकाळी 7.47 च्या सुमारास स्थानकावरील सुरक्षा कर्मचाऱ्यांना ‘बेसमेंट-2’मध्ये ए-5 ऑडिट बिल्डिंगच्या बाहेर पडण्याच्या मार्गाजवळ साप दिसला. मेट्रो स्थानकातील कर्मचाऱ्यांनी तातडीने ‘वाईल्डलाईफ प्रोटेक्शन अॅण्ड रेस्क्यू असोसिएशन’ला त्याची माहिती दिली असता, सर्पमित्र अतुल कांबळे आणि वन विभागाचे अधिकारी तातडीने मेट्रो स्थानकात पोहोचले. त्यांनी सापाची ओळख ‘रसेल्स व्हायपर’ (घोणस) अशी पटवली आणि त्याला पकडून पाणी पाजले. सायंकाळी त्याला नैसर्गिक अधिवासात सोडल्यानंतर मेट्रो कर्मचाऱ्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

Comments are closed.