विधानपरिषदेच्या उपसभापतीपदाची निवडणूक पुढील आठवड्यात, निलम गोऱ्हेंना पुन्हा संधी की नवा चेहरा?

विधान परिषद उपसभापती निवडणूक : विधान परिषदेच्या उपसभापती पदासाठीची निवडणूक पुढील आठवड्यात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यानविधान परिषदेचे उपसभापती पद एकनाथ शिंदेंच्या (मराठी) नेतृत्वातील शिवसेनेला मिळण्याची दाट शक्यता आहे. महायुतीत विधानसभा अध्यक्षपद भाजप, उपाध्यक्ष पद राष्ट्रवादी, तर विधान परिषदेत सभापती पद भाजपकडे असल्यामुळे उपसभापती पद शिवसेनेच्या वाट्याला येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यानविधान परिषद उपसभापती पदी पुन्हा एकदा निलम गोर्हे (Neelam Gorhe) यांची वर्णी लागण्याची दाट शक्यता आहे.

कोण आहेत नीलम गोऱ्हे? (Neelam Gorhe)

शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्या नीलम गोऱ्हे यांच्याकडे पक्षातील एक जबाबदार आणि विश्वासू व्यक्तिमत्व म्हणुन त्यांच्याकडे पाहिलं जातं. त्या शिवसेना शिंदे गटाच्या विधानपरिषदेच्या उपसभापती म्हणून त्यांनी यापूर्वेकडीलहि काम पाहलविले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून त्या विधान परिषदेवर शिवसेनेचं प्रतिनिधित्व करतात. प्रवक्त्या म्हणून त्या माध्यमांसमोर शिवसेनेची बाजू प्रभावीपणे मांडत असतात. राज्यातील महिलांच्या प्रश्नांवर त्या सातत्यानं आवाज उठवत असतात.

शिवसेनेची पुणे जिल्ह्याची जबाबदारीही त्यांच्याकडं होती. शिवसेनेतील एक अभ्यासू महिला कार्यकर्त्या म्हणून त्यांची ओळख आहे. आतापर्यंत तीनदा त्या विधानपरिषदेवर निवडून गेल्या आहेत.

पोद्दार आयुर्वेदिक महाविद्यालयातून बीएसएएमची पदवी त्यांनाी घेतली. 1992 मध्ये त्यांनी बँकॉक येथील एशियन लोकविकास संस्थेत प्रशिक्षण विषयक डिप्लोमाही पूर्ण केला आहे. मराठी, हिंदी आणि इंग्रजीवर त्यांचं प्रभुत्व आहे. त्यांनी युवक क्रांती दल म्हणजेच युक्रांदच्या माध्यमातून महिलांच्या प्रश्नावर काम करायला सुरुवात केली. आज त्या राज्याच्या राजकारणात सक्रिय स्त्री नेत्या म्हणून कार्यरत आहे.

महाराष्ट्र विधान परिषद:धान परिषदेत आज काय महत्त्वाच घडणार?

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे नामांतरण करण्याचा सरकारच्या प्रयत्नावर काँग्रेस आमदार आक्रमक होण्याची शक्यता आहे. मे 2026 मध्ये वन विभागाच्या वतीने संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे नाव बदलून ते अटल बिहारी वाजपेयी पार्क करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आलेला आहे. याला काँग्रेस आमदारांनी विरोध केला असून याबाबतचा प्रश्न भाई जगताप, सतीश पाटील, अभिजीत वंजारी, धीरज लिंगाडे या आमदारांनी विधान परिषदेत मांडला आहे. यापूर्वी कांदिवली येथील पूर्व द्रुत्कती मार्गावरील एस ए आय याच्या जागेत माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे स्मारक उभारण्यात आला असताना आता राष्ट्रीय उद्यानाचे नाव बदलायचं कारण काय? असा काँग्रेस आमदारांनी सवाल उपस्थित केला आहे

सार्वजनिक आरोग्य विभागाकडून विविध बालसंगोपन योजना राबवल्या जात असताना देखील राज्यात 2025-26 या आर्थिक वर्षात तब्बल 12,792 बालकांचा मृत्यू झाल्याची बाब समोर आले आहे. राज्यात दररोज सरासरी 35 बालकांना आपले प्राण कमवावे लागत असून पाच वर्षांपूर्वीच्या सरासरी 45 मृत्यूंच्या तुलनेत घट झाली असली तरी बालमृत्यू रोखण्याच मोठ आव्हान निर्माण झाले असल्याचा प्रश्न आमदार संजय खोडके यांना मांडला असून याकडे सरकारचे लक्ष ते वेधतील

इतर महत्वाच्या बातम्या

Comments are closed.