विधानपरिषद निवडणुकीत भाजपच्या वाट्याला 6 जागा, इच्छूकांची फिल्डिंग, ही 12 नावं रेसमध्ये, कोणाला
मुंबई: विधान परिषदेसाठी आज भाजपची खलबतं होणार असल्याची माहिती समोर आली आहे. भाजपच्या कोअर कमिटीची आज रात्री १० वाजता वर्षा निवासस्थानी बैठक पार पडणार असल्याची माहिती समोर आली आहे. विधान परिषदेच्या (Maharashtra Vidhan Parishad Election 2026) निवडणुकीसाठी नावांची चर्चा बैठकीत पार पडणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी संघटनेतील जुन्या कार्यकर्त्यांना संधी दिली जाणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.(Maharashtra Vidhan Parishad Election 2026)
आजच्या बैठकीतील चर्चेनंतर भाजपकडून काही नावांचा प्रस्ताव केंद्रीय नेतृत्वाला पाठवला जाणार असल्याची चर्चा आहे. विधान परिषदेसाठी भाजपच्या वाट्याला १० पैकी ६ जागा मिळणार आहेत. विधान परिषदेच्या सहा जागांसाठी नावांची चर्चा बैठकीत पार पडणार आहे. विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी प्रज्ञा सातव यांच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब झाल्याची सूत्रांची माहिती आहे. इतर ५ नावांवर चर्चा होत असताना जातीय आणि प्रादेशिक समतोलाचा देखील विचार होणार असल्याची माहिती समोर आली आहे.(Maharashtra Vidhan Parishad Election 2026)
Maharashtra Vidhan Parishad Election 2026 : भाजपातील या नेत्यांची नावे चर्चेत
विधान परिषदेसाठी इच्छुकांकडून फिल्डिंग लावण्यास सुरुवात झाली अशून गाठीभेटींना देखील वेग आला आहे. मुख्यमंत्र्यांच्या भेटीला विधान परिषदेसाठी इच्छुक असलेल्यांच्या सह्याद्री अतिथीगृह आणि काल मुंबईतील मेळाव्यात गाठीभेटी पार पडल्या. माधवी नाईक, राजेश पांडे, रणजितसिंह निंबाळकर, राम सातपुते, संजय काका पाटील, संजय केणेकर, प्रज्ञा सातव, अर्चना पाटील चाकूरकर, दादाराव केचे, संजय भेंडे, संदीप जोशी, दयाशंकर तिवारी यांच्या नावांची चर्चा आहे. (Maharashtra Vidhan Parishad Election 2026)
Maharashtra Vidhan Parishad Election 2026 : विधान परिषदेसाठी मतदान आणि निकाल कधी?
महाराष्ट्र विधान परिषदेच्या 9 जागांसाठी निवडणूक जाहीर (Maharashtra Vidhan Parishad Election 2026) करण्यात आली आहे. विधान परिषदेच्या 9 जागांसाठी नियमित निवडणूक तर एका जागेची पोटनिवडणूक पार पडणार आहे. भारत निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्रातील विधान परिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. विधान परिषदेच्या 10 जागांसाठी 12 मे रोजी मतदान होणार आहे. 12 मे रोजी सकाळी 9 वाजल्यापासून दुपारी 4 वाजेपर्यंत मतदान होईल. तर 12 मे रोजीच निकाल जाहीर होणार आहे. (Vidhan Parishad Election 2026)
विधान परिषदेच्या एका जागेसाठी पोट निवडणूक होणार आहे. प्रज्ञा सातव (Pradnya Satav) यांच्या भाजप प्रवेशानंतर रिक्त असलेल्या परिषदेच्या जागेची पोटनिवडणूक सुद्धा 12 मे रोजी पार पडणार आहे. काँग्रेसमधून राजीनामा दिल्यानंतर प्रज्ञा सातव यांनी भाजपात पक्षप्रवेश केला होता. प्रज्ञा सातव यांच्या आमदारकीचा कार्यकाळ 27 जुलै 2030 पर्यंत होता. दरम्यान, 9 जागांसाठी नियमित निवडणूक तर एका जागेची पोटनिवडणूक पार पडणार आहे. या पोटनिवडणुकीच्या जागेवर महायुतीचा विजय निश्चित आहे. दोन्ही निवडणुकांसाठी वेगवेगळा सदस्यांचा कोटा असणार आहे. बहुमत असलेल्या भाजपकडेच पोटनिवडणुकीची जागा जाण्याची शक्यता आहे.
Maharashtra Vidhan Parishad Election 2026 : 10 पैकी 9 जागा सहज महायुतीला जिंकता येणार
विधान परिषदेच्या 10 जागांसाठी दोनवेळा मतदान करावं लागणार आहे. 9 जागांसाठी एकदा मतदान होणार तर प्रज्ञा सातव यांची रिक्त झालेल्या जागेसाठी मतदान होईल. दोन्ही मतदान जरी एका दिवशी होणार असलं, तरी आमदारांना दोन वेळा मतदान करावं लागणार आहे. 9 जागांसाठी 29 चा कोटा असणार आहे. तर एका जागेसाठी 51 टक्के मतांची मर्यादा असणार आहे. या समीकरणामुळे 10 पैकी 9 जागा सहज महायुतीला जिंकता येणार तर महाविकास आघाडीला 1 जागेवर समाधान मानावं आहे.
Maharashtra Vidhan Parishad Election 2026 : विधान परिषदेतील पुढील 9 आमदारांचा कार्यकाळ संपणार
उद्धव ठाकरे (शिवसेना – उबाठा)
नीलम गोऱ्हे (शिवसेना)
शशिकांत शिंदे (राष्ट्रवादी – शरद पवार गट)
अमोल मिटकरी (राष्ट्रवादी – अजित पवार गट)
गोपीचंद पडळकर (भाजप)
रणजितसिंह मोहिते-पाटील (भाजप)
राजेश राठोड (काँग्रेस)
प्रवीण दटके (भाजप)
रमेश कराड (भाजप)
Vidhan Parishad Byelection 2026 : विधान परिषदेची पोटनिवडणूक
प्रज्ञा सातव
Maharashtra Vidhan Parishad Election 2026 : विधान परिषदेच्या निवडणुकीचा संपूर्ण कार्यक्रम
निवडणुकीची अधिसूचना जारी करणे : 23 एप्रिल, 2026
उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस: 30 एप्रिल 2026
उमेदवारी अर्जांची छाननी: 2 मे 2026
उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख: 4 मे 2026
मतदानाची तारीख: 12 मे 2026
मतदानाची वेळ: सकाळी 9 वाजेपासून ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत आहे.
मतमोजणी: 12 मे 2026 संध्याकाळी 5 वाजता
निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याची अंतिम तारीख: 13 मे 2026
आणखी वाचा
Comments are closed.