पुणे विधान परिषदेत राष्ट्रवादीच्या माघारीबाबत बैठकीत काय घडलं? काँग्रेसच्या चंदू कदमांनी सांगित

पुणे : पुणे काँग्रेसचे गटनेते चंदू कदम यांनी स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर (Vidhan Parishad Election 2026)मुंबईतील ‘सिल्व्हर ओक’ येथे झालेल्या बैठकीबाबत माहिती दिली. या बैठकीत उमेदवारी मागे घेण्याबाबत कोणतीही चर्चा किंवा सूचना देण्यात आली नव्हती, असे त्यांनी स्पष्ट केले.(Vidhan Parishad Election 2026) चंदू कदम म्हणाले की, स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची निवडणूक कशी लढवायची, काँग्रेसकडे किती मते आहेत आणि निवडणुकीसाठी कोणती रणनीती आखावी, यावर चर्चा करण्यासाठी आम्हाला मुंबईतील सिल्व्हर ओक बंगल्यावर बोलावण्यात आले होते. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि इतर वरिष्ठ नेते उपस्थित होते. काँग्रेसकडून मी आणि माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर उपस्थित होतो.(Vidhan Parishad Election 2026)

त्यांनी सांगितले की, बैठकीदरम्यान उमेदवारी अर्ज मागे घेण्याबाबत कोणतीही माहिती देण्यात आली नव्हती. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे किंवा काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये यासंदर्भात काही चर्चा झाली असेल, तर त्याची आम्हाला कोणतीही माहिती नाही. चंदू कदम यांनी पुढे सांगितले की, सिल्व्हर ओकवरील बैठकीत केवळ निवडणुकीची रणनीती, मतांची गणिते आणि पुढील राजकीय भूमिका यावरच चर्चा झाली. त्यानंतर दुपारी सुमारे तीन वाजण्याच्या सुमारास आम्हाला थेट माहिती मिळाली की, श्रीकांत पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. त्यामुळे उमेदवारी मागे घेण्याचा निर्णय बैठकीत चर्चिला गेला नव्हता, असेही त्यांनी स्पष्ट केले.(Vidhan Parishad Election 2026)

Vidhan Parishad Election 2026: बैठकीत नेमकं काय घडलं?

आम्हाला मुंबईतील सिल्व्हर ओक बंगल्यावर बैठकीसाठी बोलावण्यात आले होते. स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची निवडणूक कशी लढवायची, काँग्रेसकडे किती मते आहेत आणि निवडणुकीची रणनीती काय असावी, यावर चर्चा करण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि इतर वरिष्ठ नेते उपस्थित होते. काँग्रेसकडून मी आणि माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर उपस्थित होतो.या बैठकीत आम्हाला उमेदवारी मागे घेण्याबाबत कोणतीही माहिती किंवा सूचना देण्यात आली नव्हती. शरद पवार, सुप्रिया सुळे किंवा काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये काही चर्चा झाली असेल, तर त्याची आम्हाला माहिती नाही. सिल्व्हर ओकवरील बैठकीत केवळ निवडणुकीची रणनीती आणि पुढील भूमिका यावरच चर्चा झाली. त्यानंतर दुपारी सुमारे तीन वाजता आम्हाला थेट माहिती मिळाली की श्रीकांत पाटील यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे.

Vidhan Parishad Election 2026: काँग्रेस शहराध्यक्ष दीप्ती चौधरींचाही संताप

तर पुणे काँग्रेस शहराध्यक्ष दीप्ती चौधरी यांनी बोलताना म्हटलं की, पुणे विधान परिषद निवडणुकीत उमेदवार माघारीबाबत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)कडून काँग्रेसला कोणतीही पूर्वकल्पना देण्यात आली नव्हती. खासदार सुप्रिया सुळे यांनी काय भूमिका मांडली याची माहिती आम्हाला माध्यमांतून समजली. याबाबत काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनाही कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नव्हती. विधान परिषदेचे उमेदवार श्रीकांत पाटील हे केवळ राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे नव्हते, तर ते महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार होते. सुप्रिया सुळे यांनी निवडणुकीत पैशांचा घोडेबाजार सुरू असल्याचा आरोप करत माघारीचा निर्णय घेतल्याचे सांगितले. मात्र नेमके काय घडले, याची कोणतीही माहिती राष्ट्रवादी काँग्रेसकडून काँग्रेसला देण्यात आली नाही. या संपूर्ण प्रकाराबाबत काँग्रेसने आपल्या वरिष्ठ नेत्यांकडे नाराजी व्यक्त करत तक्रार केली आहे. महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्ये समन्वय आणि संवाद अपेक्षित असताना राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) कडून अशा पद्धतीने निर्णय घेण्यात आल्याने आश्चर्य आणि नाराजी व्यक्त होत आहे.

Comments are closed.