पुणे, कोकण राष्ट्रवादीला, ठाणे, नाशिक शिवसेनेला; सोलापूरसह 11 जागा भाजपकडे; विधान परिषदेसाठी मह

विधान परिषद निवडणूक 2026: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषद निवडणुकीसाठी (Vidhan Parishad Election 2026) अखेर महायुतीचे अंतिम जागावाटप निश्चित झाले आहे. प्रचंड रस्सीखेच आणि जागांवरील दावे-प्रतिदाव्यानंतर 17 जागांसाठी तिन्ही पक्षांमध्ये एकमत झाले आहे. अंतिम फॉर्म्युलानुसार भाजप 11, शिवसेना 4 तर राष्ट्रवादी 2 जागांवर निवडणूक लढवणार आहेत. प्रदेश आणि केंद्रातील नेत्यांच्या चर्चेनंतर जागांवर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. अतिरिक्त एक जागा पदारात पाडून घेण्यात राष्ट्रवादीला यशस्वी झाली. तर 7 जागांवर अडून बसलेल्या शिवसेनेला 4 जागांवर  समाधान मानावे लागणार आहे. (Mahayuti Vidhan Parishad Election 2026)

महायुतीचे अंतिम जागावाटप- (Vidhan Parishad Election 2026)

  • भाजप -11
  • शिवसेना – 4
  • राष्ट्रवादी काँग्रेस – २

भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, कोणाला कोणती जागा?, संपूर्ण यादी- (Vidhan Parishad Election 2026)

भाजपा-(भाजप विधान परिषद निवडणूक 2026)

1) सोलापूर-
2) जळगाव-
3) भंडारा-गोंदिया
4) वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली
5) अमरावती-
6) धाराशिव-लातूर-बीड
7) नागपूर-
8) छ. संभाजीनगर- जालना
९) अहिल्यानगर-
10) सांगली-सातारा
11) नांदेड-

शिवसेना-(शिवसेना विधान परिषद निवडणूक 2026)

1) ठाणे-
2) नाशिक-
3) परभणी-
4) यवतमाळ-

राष्ट्रवादी काँग्रेस- (NCP Vidhan Parishad Election 2026)

1) कोकण-
2) पुणे-

विधान परिषदेच्या 17 जागांसाठी निवडणुका- (Vidhan Parishad Election 2026)

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाच राज्यात न झाल्याने या मतदारसंघामध्ये पूर्वी निवडून आलेल्या आमदारांचा कार्यकाळ संपुष्टात येऊनही निवडणूक होऊ शकली नाही. अशात, गेल्या दोन अडीच वर्षांपासून आमदारकीच्या जागा रिक्त आहेत. स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील एकूण मतदार संख्येच्या 75 टक्के मतदार संख्या असेल तर विधान परिषदेची निवडणूक घेता येते. विधान परिषदेच्या एकूण 78 सदस्य संख्येपैकी 22 सदस्य स्थानिक स्वराज्य संस्थांद्वारे निवडून जात असतात. सोलापूरअहमदनगर, ठाणे, जळगाव, नांदेड, सांगली-सातारा, यवतमाळ, पुणेभंडारा-गोंदिया, नाशिक, अमरावतीच्या स्थानिक संस्थेच्या विधान परिषदेच्या जागांसाठी निवडणूक होणार आहे.

आधी कोणती जागा कोणाकडे होती? आणि कोणाकडे किती जागा? (Vidhan Parishad Election 2026)

आधीचे आमदार कोण?-

विधानपरिषद निवडणूकीचा संपूर्ण कार्यक्रम- (Vidhan Parishad Election 2026)

  • निवडणुकीची अधिसूचना- 25 मे
  • अर्ज भरण्याची शेवटची तारीख- 1 जून
  • उमेदवारी अर्जांची छाननी- 2 जून
  • अर्ज माघारीची मुदत- 4 जून
  • मतदान- 18 जून (स.8 ते दु.4)
  • मतमोजणी- 22 जून

राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, VIDEO:

संबंधित बातमी:

Vidhan Parishad Election 2026: 11-4-2…विधान परिषदेसाठी महायुतीचे अंतिम जागावाटप निश्चित; राष्ट्रवादीला यश, 7 जागांवर अडून बसलेल्या शिवसेनेला 4 जागा

आणखी वाचा

Comments are closed.