साडेआठ वाजता सुरु झालेली बैठक रात्री 1.30 वाजता संपली, सुनेत्रा पवारांनी पुणे विधानपरिषदेची उमे

विधान परिषद निवडणूक 2026: राज्यातील आगामी विधानपरिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने पुण्यातील आपला उमेदवारी निश्चित केला आहे. रविवारी रात्री पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) कार्यालयात तब्बल पाच तास सुरु असलेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार पुणे राष्ट्रवादीची विधान परिषदेची (Vidhan Parishad Election 2026) जागा विक्रम काकडे (Vikram Kakde) यांना देण्यात आली.  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पुण्यातील कार्यालयात काल रात्री 8.30 वाजता ही बैठक सुरु झाली होती. या बैठकीला संजय काकडे (Sanjay Kakde) हेदेखील उपस्थित होते. पुण्यातील विधान परिषदेच्या जागेवरुन लढण्यासाठी अजितदादा गटातील अनेक नेते इच्छूक होते. ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडेच राहावी, यासाठी स्थानिक नेते प्रचंड आग्रही होते. तर भाजपचे (BJP) नेतेही या जागेसाठी गळ टाकून बसले होते. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या एका फोननंतर पुणे विधानपरिषदेची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला जाईल, हे स्पष्ट झाले. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार निश्चित होत नव्हता. अखेर मुख्यमंत्र्याकडून विक्रम काकडे यांना उमेदवारी द्यायला ग्रीन सिग्नल मिळाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बैठकीत उमेदवारी शिक्कामोर्तब करण्यात आले. (Vidhan Parishad Election 2026)

पुणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस सुमित्रा पवारांच्या पक्षाकडून माजी आमदार सुनील टिंगरे यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यताही वर्तविली जात होती. महायुतीत झालेल्या माहिती ठरलेल्या फॉर्मुलानुसार सुनील टिंगरे हे महायुतीचे एकमेव उमेदवार असतील, असे म्हटले जात होते. मात्र, सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांनी विक्रम काकडे यांना संधी दिली. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून शहराध्यक्ष श्रीकांत पाटील यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यामुळे पुण्यात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत होणार आहे. आता श्रीकांत पाटील त्यांची उमेदवारी माग घेणार हे पाहणं महत्त्वाचे ठरेल.

दरम्यान, विधानपरिषदेच्या 17 जागांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस, महायुती आणि मविआचा फॉर्म्युला ठरला असला तरी बंडखोरांना थंड करण्याचे आव्हान महायुतीपुढे असेल.

Who is Vikram Kakde: कोण आहेत विक्रम काकडे?
1) खासदार संजय काकडे यांचे चिरंजीव

2) अजित पवारांचे निष्ठावंत कार्यकर्ता

३) महाराष्ट्रमुख्यमंत्र्यांना त्रास होतो देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू

4) उत्तम बांधकाम व्यावसायिक

5) 4 वर्ष स्टेट शुटींग चॅम्पियन, राष्ट्रीय पातळीवरील संघात देखील सहभाग

6) आंतरराष्ट्रीय पातळीवर इटली, फ्रान्स जर्मनी, थायलंड येथील थाय ओपन स्पर्धेतदेखील सहभाग

आणखी वाचा

विधान परिषदेसाठी भाजपचे 11 उमेदवार जाहीर; प्राजक्त तनपुरे, रेवती सुळेंचे होणारे सासरे अरूण लखानी यांचं नाव, पाहा यादी

आणखी वाचा

Comments are closed.