अंबादास दानवेंच्या उमेदवारीनं महाविकास आघाडीत अंतर्गत वाद, भाजप अतिरिक्त उमेदवार देण्याची चर्चा

विधान परिषद निवडणूक: विधानपरिषदेच्या (vidhanparishad) निवडणुकांसाठी उमेदवारांची अधिकृतपणे घोषणा होण्यास सुरुवात झाली आहे. भाजपनंतर आता ठाकरेंच्या शिवसेनेकडून महाविकास आघाडीचा उमेदवार जाहीर करण्यात आला आहे. माजी विरोधी पक्षनेते आणि शिवसेना नेते अंबादास दानवे (Ambadas danve ) यांचं नाव विधानपरिषदेचे उमेदवार म्हणून जाहीर करण्यात आलं आहे. दरम्यान, यानंतर भाजपा आता अतिरिक्त उमेदवार देणार का याची जोरदार चर्चा सुरु झाली आहे.  उद्धव ठाकरे उमेदवार नसल्याने महाविकास आघाडीत अंतर्गत वाद आणि त्याचा अचूक फायदा घेण्याची तयारी भाजपने केल्याची चर्चा सुरु आहे.

दरम्यान, भाजपा अतिरिक्त उमेदवार देण्याबाबत भाजपा केंद्रीय पक्ष पातळीवर चर्चा करण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे अतिरिक्त मतांचा कोटा, तसंच भाजपचे देखील अतिरिक्त मतं, एनसीपी आणि भाजापच्या सहमतीने अतिरिक्त उमेदवार दिल्यास निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता कमी असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.  भाजपाने सध्या 5 उमेदवार जाहीर केले आहेत. अंबादास दानवे यांना उमेदवारी दिल्याने विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार का? याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे.

अंबादास दानवे उद्या सकाळी 11 वाजता ते उमेदवारी अर्ज दाखल करणार

ठाकरेंच्या शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या जागी आता अंबादास दानवे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. आदित्य ठाकरे यांनी याबाबतची माहिती दिली. उद्धव ठाकरे यांनीच विधानपरिषदेवर जावं अशी महाविकास आघाडीतील नेत्यांची इच्छा होती. त्यात, ठाकरे गटातील नेत्यांनीही उद्धव ठाकरेंच्याच नावाचा आग्रह धरला होता. मात्र, आता उद्धव ठाकरे यांनी आपलं वजन अंबादास दानवे यांच्या पारड्यात टाकल्यामुळे, आता ते ठाकरे गटाचे अधिकृत उमेदवार असतील. अंबादास दानवे हे शिवसेनेचे म्हणजेच महाविकास आघाडीचे विधान परिषदेचे उमेदवार असतील, उद्या सकाळी 11 वाजता ते उमेदवारी अर्ज दाखल करतील, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले. दरम्यान, काही महिन्यांपूर्वी अंदाबास दानवे यांचा कार्यकाळ संपुष्टात आला होता. त्यानंतर, उद्धव ठाकरे यांचा विधानपरिषदेतील कार्यकाळं संपल्याने त्यांच्या जागी कोण जाणार याची उत्सुकता सर्वांनाच होती.

विधान परिषदेचा एक आमदार निवडून येण्यासाठी 28 मतांचा कोटा

विधान परिषदेच्या 10 जागांसाठी 12 मे रोजी मतदान होणार आहे. 12 मे रोजी सकाळी 9 वाजल्यापासून दुपारी 4 वाजेपर्यंत मतदान होईल. तर 12 मे रोजीच निकाल जाहीर होणार आहे. (Vidhan Parishad Election 2026).  विधानसभेतील संख्याबळानुसार भाजपच्या वाट्याला 6, शिवसेना 2, राष्ट्रवादी 1 आणि महाविकास आघाडी 1 जागा येणार आहे. विधान परिषदेचा एक आमदार निवडून येण्यासाठी 28 मतांचा कोटा आवश्यक आहे. महायुतीत भाजप (131 आमदार), एकनाथ शिंदे यांची शिवसेना (57 आमदार) आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी (40 आमदार) असे बलाबल पाहता महायुतीचे 9 उमेदवार सहज निवडून येऊ शकतात. तर महाविकास आघाडीचे एकूण संख्याबळ 46 आहे. त्यामुळे त्यांचा केवळ एकच उमेदवार सहज निवडून येऊ शकतो. (BJP Shivsena NCP Candidate List Vidhan Parishad Election 2026) गेल्या काही दिवसांपासून विधानपरिषदेसाठी उद्धव ठाकरेंचं (Uddhav Thackeray) नाव चर्चेत होतं. तसेच, काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून त्यांनाच आग्रह केला जात होता. मात्र, अंबादास दानवेंना ठाकरेंच्या शिवसेनेकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या:

Congress :मोठी बातमी, अंबादास दानवेंच्या उमेदवारीवरुन मविआत फूट?, काँग्रेस विधानपरिषदेसाठी उमेदवार देणार, हर्षवर्धन सपकाळ पक्षनेतृत्त्वासोबत चर्चा करणार

आणखी वाचा

Comments are closed.