मोठी बातमी ! गोपीचंद पडळकरांसह विधानपरिषदेच्या 5 रिक्त जागेवर निवडणूक कार्यक्रम जाहीर
मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणुकानंतर आता विधानपरिषदेच्या 5 जागांसाठीची निवडणूक (Election) जाहीर झाली आहे. त्यामुळे, आता विधानपरिषदेच्या या 5 जागांवर कोणाचा नंबर लागणार याची उत्सुकता सर्वांनाच आहे. विधान परिषदेच्या (Vidhanparishad) रिक्त जागांसाठी निवडणूक जाहीर झाली असून 27 मार्च रोजी मतदान प्रकिया पार पडणार आहे. त्यासाठीचा निवडणूक कार्यक्रम निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आला आहे. भाजपच्या 3, राष्ट्रवादी अजित पवार 1 आणि शिवसेना शिंदे गटाच्या 1 आमदारांसाठी ही निवडणूक पार पडणार असून या निवडणुकीसाठी मतदानाचा अधिकार केवळ आमदारांना असणार आहे. सध्या, राज्यात भाजप महायुतीला मोठं बहुमत असल्याने या जागांवर पुन्हा संबंधित पक्षाचेच उमेदवार विजयी होतील. मात्र, राजकीय पक्षांकडून कोणाला संधी मिळणार याची उत्सुकता सर्वांनाच आहे.
विधानसभा निवडणुकीत विजयी झाल्यामुळे विधानपरिषदेवर असलेल्या 5 आमदारांच्या जागा रिक्त झाल्या आहेत. त्यामध्ये, शिवसेना शिंदे गटाचे आमदार आमशा पाडवी, राष्ट्रवादी काँग्रेस राजेश विटेकर, भाजप आमदार प्रवीण दटके, भाजप गोपीचंद पडळकर आणि भाजपा रमेश कराड या सदस्यांच्या रिक्त जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. आता, या रिक्त जागांसाठी भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीकडून कोणाला संधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
आमदार आमश्या पाडवी यांचा विधानपरिषदेचा कार्यकाळ 7 जुलै 2028 पर्यंत आहे. तर, राष्ट्रवादीच्या राजेश विटेकर यांचा कार्यकाळ 27 जुलै 2030 पर्यंत आह. भाजप नेते आणि आमदार प्रवीण दटके यांचा कार्यकाळ 13 मे 2026 पर्यंत असून आमदार रमेश कराड आणि गोपीचंद पडळकर यांचाही कार्यकाळ 13 मे 2026 पर्यंत आहे. मात्र, विधानसभा निवडणुकीत हे सर्व आमदार विजयी झाल्याने त्यांच्या रिक्त जागेवर याच महिन्यात निवडणूक होणार आहे.
कसा असेल निवडणूक कार्यक्रम ?
10 मार्च ते 17 मार्च अर्ज भरण्याची प्रक्रिया
अर्जाची छाननी 18 मार्च रोजी होणार
20 तारखेला अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस
27 तारखेला विधान परिषदेच्या जागांसाठी मतदान घेण्यात येणार आहे.
विधान परिषदेतील पक्षनिहाय संख्याबळ :-
एकूण 78
महायुती – 32
भाजप 19
शिवसेना 6
राष्ट्रवादी 7
महाविकास आघाडी – 17
शरद पवार 3
काँग्रेस 7
उबाथा 7
अपक्ष 3
एकूण सदस्य संख्या – 78
विद्यमान सदस्य क्रमांक –
रिक्त सदस्य संख्या – 26 (स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमुळे जागा अधिक रिक्त आहेत)
हेही वाचा
अधिक पाहा..
Comments are closed.