साडेचार फुटाचा मंत्री म्हणतोय, धर्म विचारुन सामान घ्या; वडेट्टीवारांची नितेश राणेंवर बोचरी टीका
Vijay Wadettiwar On Nitesh Rane : देशात आणि राज्यात जातीयतेचे विष पेरलं जात आहे. बीड मध्ये दोन जाती एकमेकाच्या पुढे आणल्या जात आहेत. अशातच आता तो साडेचार फुटाचा मंत्री सांगत आहे की जात विचारून दुकानातून समान घ्या. असे म्हणत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांचं नाव न घेता अप्रत्यक्षपणे बोचरी टीका केली आहे. दोन भाऊ एकत्र येत आहेत त्याची चिंता भाजपला पडली आहे. किंबहुना दोन भाऊ एकत्र येत असताना सर्वधर्म समभाव घेऊन सोबत यावं. तुमचे आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांचे विचार घेऊन दोन्ही ठाकरेंनी सोबत यावं. असं झाल्यास आम्ही तुमचा सत्कार करू, असेही विजय वडेट्टीवार म्हणाले.
बावनकुळे यांच्या पक्षाला लोकांची घरे फोडायचे आहे का?
भाजप प्रदेशाध्यक्ष काँग्रेसला फोडा, काँग्रेस रिकामी करा असे म्हणत आहे. मात्र चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पक्षाला लोकांची घरे फोडायचे आहे का? असा सवाल ही विजय वडेट्टीवारांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना केलाय. बावनकुळे यांनी पुणे भाजप पदाधिकाऱ्यांच्या बैठकीला संबोधित करताना म्हटले होते की, काँग्रेसला फोडा, काँग्रेस रिकामी करा असा मंत्र भाजप पदाधिकाऱ्यांना दिला. काँग्रेसमधून कोणी आलं तरी तुमचा विचार अगोदर करणार, असंही बावनकुळे म्हणाले. यावर आता विजय वडेट्टीवारांनी उलट सवाल केला आहे. पुढे बोलताना बावनकुळे म्हणाले की, आमचे दिवस आले तर हम भी चुनचुनके मारेंगे. शिंदे आणि अजित पवार यांची काय परिस्थिती आहे. त्याचा वापर केला जात आहे आहे. दरम्यान, पुढच्या निवडणुकीत ते कुठे असतील हे बघावं लागेल. सोबतच सीबीआईला आणि ईडीला बाजू करा मग बगा काय होतं, असेही ते म्हणाले.
..तर राज्यात आमचे 65 आमदार निवडून आले असते- विजय वडेट्टीवार
मराठवाड्यात राहुल गांधी यांचे स्वागत ओबीसी समाजकडून होतं आहे. निवडणुका होत नसल्याने ओबीसी आणि आदिवासी यांचे नुकसान होत आहे. दरम्यान पुढच्या निवडणुका आम्ही स्वतंत्र लढू. कारण त्यांची मते आम्हाल मिळत नाहीत. पण आमचे मते त्यांना जात आहे. आम्ही निवडणूक लढवली असती तर राज्यात आमचे 65 आमदार निवडून आले असते. असा दावाही विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.
पुढील लढाई पाण्याचा प्रश्नांवर लढावी लागेल. दुसरीकडे सरकारने शेतकर्याची फसवणूक केली आहे. दहा दिवस झाले पहलगाम हल्ल्यातील आरोपी सापडत नाहीत, ते कधी भेटणार ते सांगा, तुम्ही सांगत आहेत की कपडे भेटली, लोकेशन भेटले. मग दहशतवादी का सापडत नाही. असेही विजय वडेट्टीवार म्हणाले.
हे ही वाचा
अधिक पाहा..
Comments are closed.