मतांची चोरी आणि बेइमानी करुनच फडणवीसांचं सरकार सत्तेल आलं, वडेट्टीवारांचा हल्लाबोल

विजय वाडेटीवार: या देशात निवडणूक आयोगाच्या माध्यमातून मतांची चोरी कशी होते याचे पुरावे राहुल गांधी यांनी मांडले आहेत. त्यावर त्यांची चिप खराब झाल्याची टीका केली गेली. आता नितीन गडकरी यांनी एका मुलाखतीमध्ये साडेतीन लाख मतदान कमी केले आणि ते माझ्या जवळचे होते असं स्पष्ट केल्याचे मत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केले. जर गडकरी साडेतीन लाख मतदान कमी झाल्याचे सांगत असतील तर विधानसभेत मतदान वाढवूनच फडणवीसांचं सरकार सत्तेत आले हे आता लपून राहील नाही असे वडेट्टीवार म्हणाले. राज्यातलं सरकार हे मतांची चोरी करुन आणि बेइमानी करुन सत्तेत आल्याचे वडेट्टीवार म्हणाले.

नितीन गडकरी माझ्या हक्काचे मतदान कमी गेले म्हणत असतील तर गडकरींना या निवडणुकीत हरवायचं होत का? साडेतीन लाख मतदान कमी करुन गडकरींसोबत यांना कोणता बदला घ्यायचा होता का? असे सवाल वडेट्टीवार यांनी केले आहेत. जर गडकरी साडेतीन लाख मतदान कमी झाल्याचे सांगत असतील तर विधानसभेत मतदान वाढवूनच फडणवीसांच सरकार मतदान सत्तेत आले आता हे लपून राहीलं नाही असे वडेट्टीवार म्हणाले.

फडणवीस आता गडकरी साहेबांच्या डोक्यातील चिप खराब झाली असे ते म्हणतील का?

आता मी फडणवीस यांच्याकडून मागणी करतोय की गडकरी साहेबांच्या डोक्यातील चिप खराब झाली असे ते म्हणतील का? असा सवाल वडेट्टीवारांनी केला. राहुल गांधी म्हणत होते तेव्हा तीव्र शब्दात तुमची भूमिका मांडली आता गडकरी बोलले त्यावर ते टीका करतील का? राहुल गांधी यांची पत्रकार परिषद एका दिवसात 14 कोटी लोकांनी बघितली आहे. हे सरकार मतांची चोरी करुन बेइमानी करुन सत्तेत आलं आहे. हे आता लपून राहिला नाही. गडकरी साहेबांकडे साडेतीन लाख मतदानाचा घोळ झाला असेल तर यावर आपल्याकडे काय उत्तर आहे हे आपल्याला द्यावे लागेल असे वडेट्टीवार म्हणाले.

शिक्षण खातं भ्रष्ट, 10 हजार कोटी रुपयांचा शालार्थ आयडीचा घोटाळा

व्यापम घोटाळ्यापेक्षा जास्त शालार्थ आयडी घोटाळा महाराष्ट्रात सध्या गाजत आहे. शिक्षण खातं इतकं भ्रष्ट झाले की जवळपास 10 हजार कोटी रुपयांचा घोटाळा शालार्थ आयडीच्या माध्यमातून केला आहे. हजारो बोगस शिक्षक, संस्था चालक, अधिकारी यांच्या संगनमताने लावले गेलेत… हा घोटाळा नागपुरात उघडकीस आला असला तरीही याची व्याप्ती नाशिकसंभाजीनगर, असा दहा हजार कोटी रुपयांचा हा घोटाळा आहे. तुम्ही कारवाई करून काही अधिकारी यांना निलंबित करुन आणि एसआयटी नेमली म्हणजे होत नाही. पात्र नसताना 40 लाख रक्कम देऊन शासनाची फसवणूक करत आहे. या राज्यातील पात्र बेरोजगारांना बेरोजगार करण्याचं काम तुम्ही करत आहात असे वडेट्टीवार म्हणाले. यामध्ये आतापर्यंत फक्त थातुर मातुर कारवाई झाली आहे. या घोटाळ्यातील सर्व जबाबदार लोकांना अटक झाली पाहिजे असे वडेट्टीवार म्हणाले.

री उघड करणाऱ्याला आतमध्ये टाकणारं सरकार अशी यांची ओळख

ज्या संस्था चालकांनी सुरुवातीला तक्रार केली त्यालाच या लोकांनी अटक केली आहे. म्हणजे सरकारची भूमिका घोटाळे उघडकीस येऊ नये म्हणून घोटाळे उघडकीस आणणाऱ्या लोकांना आतमध्ये टाका अशी भूमिका यांची आहे. चोरी उघड करणाऱ्याला आतमध्ये टाकणारं सरकार अशी यांची ओळख झाली असल्याचे वडेट्टीवार म्हणाले.

पांडुरंगाच्या मंदिरात हिंदीत आरती होत असेल तर मराठी भाषिकावर कुरघोडीचा प्रयत्न

पांडुरंगाच्या मंदिरात हिंदीत आरती होत असेल तर महाराष्ट्रातील मराठी भाषिकावर कुरघोडी करण्याचा हा प्रयत्न आहे असे वडेट्टीवार म्हणाले. आम्ही तुमचं ऐकणार नाही असा संदेश देण्याचा या सरकारच प्रयत्न दिसत आहे. आमच्या भावनेचा आणि मराठी भाषेचा अपमान होऊ नये यासाठी सरकारने तात्काळ हे बंद करावे अशी आमची मागणी असल्याचे वडेट्टीवार म्हणाले.

महत्वाच्या बातम्या:

आणखी वाचा

Comments are closed.