राष्ट्रीय पक्ष असल्यामुळे राज्यसभेची जागा आम्हाला, तर..; विजय वडेट्टीवारांनी सांगितली मन कि बात
विजय वडेट्टीवार: महाविकास आघाडीच्या (Maha Vikas Aghadi) तीन पक्षाची आज बैठक आहे. यातील रिपोर्ट आम्ही दिल्लीला देऊ. आज कोणत्याही परिस्थितीत महाविकास आघाडीचा राज्यसभेचा उमेदवार निश्चित होईल. अजूनही कुठल्याही नावावर अंतिम निश्चिती झालेली नाही. आमची आग्रही मागणी होती की राज्यसभेची जागा आम्ही राष्ट्रीय पक्ष असल्यामुळे आम्हाला मिळावी. विधान परिषदेची जागा उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला मिळावी. तीन पक्षाच्या आघाडीमध्ये जे काही ठरेल, ते अंतिम होईल. हाय कमांड त्याबद्दल अंतिम निर्णय घेईल. अशी महत्वाचे माहिती काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी दिलीय. राज्यसभा महाविकास आघाडी उमेदवार निश्चितीकरणासंदर्भात ते नागपूर येथे गाण्याचे बोलत्यामुळे होते.
दरम्यानसुप्रिया सुळे काय म्हणत आहेत, ते उद्धव ठाकरे यांना भेटून काय बोलल्या, हे मला माहित नाही. आम्हाला अजूनही दिल्लीवरून काँग्रेसच्या भूमिकेबद्दल कुठल्याही सूचना आलेल्या नाही. असेही ते म्हणाले.
Vijay Wadettiwar : हिंदू-मुस्लिम फाटे फोडण्याची गरज नाही; जे लोक अडकले ते सर्व भारतीय
दुबईमध्ये परिस्थिती फार काही वाईट नाही. मात्र मोठ्या संख्येने लोक तिथे अडकलेले आहे. त्यांच्यामध्ये भीती आहे. त्यामुळे केंद्र सरकारची, राज्य सरकारची जबाबदारी आहे की त्यांना लवकरात लवकर सुरक्षित भारतात परत आणावे. उमरा येथे मुस्लिम भाविक अडकलेत ते सर्व भारतीय आहेत. त्यात हिंदू-मुस्लिम असे फाटे फोडण्याची गरज नाही. जे लोक अडकले आहेत, ते सर्व भारतीय असून त्यांना सुरक्षित आणणे भारत सरकारचे काम आहे. असेही विजय वडेट्टीवार म्हणाले.
Nagpur SBL Company Blast : एसबीएल स्फोट प्रकरणी मृत्युसंख्या वाढण्याची शक्यता; आम्ही सरकारला प्रश्न विचारू
नागपूरच्या दहा किलोमीटरच्या अंतरावर 14 स्फोटक कारखाने असून दरवर्षी तिथे दुर्घटना होत असतात. अनेकांचे मृत्यू होत असतात. PESO स्फोटक सुरक्षिततेसाठीच्या संस्थेचे मुख्यालय नागपुरात आहे. मुख्यमंत्री नागपूरचे आहे, मात्र दरवर्षी घटना घडतात. सरकारचा गांभीर्याने याकडे लक्ष नाही. एसबीएल स्फोट प्रकरणी मृत्युसंख्या वाढण्याची शक्यता आहे. आम्ही SBL स्फोट प्रकरणी विधिमंडळात या मुद्द्यावर स्थगन प्रस्ताव दिले आहे. आम्ही सरकारला या संदर्भात प्रश्न विचारू. मोठी मदत जाहीर केली म्हणजे पैशाने जीव खरेदी करता येत नाही. तिथल्या सुरक्षिततेच्या अनुषंगाने सरकार काय प्रयत्न करत आहे असा आमचा प्रश्न आहे. या प्रकरणात सदोष मनुष्य वधाचा नाही तर खुनाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे.
राज्यसभेचे नेमकं गणित काय आहे?
राज्यसभेत विरोधी पक्षनेतेपद कायम राखण्यासाठी त्या पक्षाकडे एकूण सदस्यसंख्येच्या किमान 10% जागा (म्हणजेच 25 सदस्य) असणे बंधनकारक आहे. सध्या काँग्रेसकडे 27 सदस्य आहेत. मात्र, यावर्षी होणाऱ्या 72 जागांच्या निवडणुकीनंतर हे संख्याबळ 25 च्या खाली जाण्याची भीती काँग्रेसला वाटत आहे. विशेषतः जूनमध्ये मल्लिकार्जुन खर्गे यांचा कार्यकाळ संपत असून, त्यांचे पद वाचवण्यासाठी काँग्रेसला प्रत्येक जागा महत्त्वाची आहे. याशिवाय महाराष्ट्रातून रजनी पाटील यांचा कार्यकाळ संपत असल्याने, ती जागा पुन्हा जिंकणे काँग्रेससाठी प्रतिष्ठेचे आणि तांत्रिकदृष्ट्या गरजेचे बनले आहे.
राज्यसभेची एकूण सदस्य संख्या : 245
विरोधी पक्षनेतेपदासाठी आवश्यक (10%) : 25
काँग्रेसचे संख्याबळ : 27
निवडणुकीचे टप्पे : 16 मार्च (37 जागा), 24 जून (24 जागा), 11 नोव्हेंबर (11 जागा)
हेही वाचा
आणखी वाचा
Comments are closed.