जयंत पाटलांची अलिकडे नाराजी जाणवते, ‘माझं काही खरं नाही..’ वक्तव्यावर वडेट्टीवार थेटच म्हणाले..

विजय वाडेटिव्हर: शक्तीपीठ मार्गाच्या विरोधातल्या मोर्चात मुंबईत झालेल्या आंदोलनात’ माझ्यावर विश्वास ठेवू नका माझं काही खरं नाही’ असं म्हणत जयंत पाटलांनी अनेक शंकांना वाट मोकळी करून दिली. त्यानंतर राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.  जयंत पाटील लवकरच अजित पवारांच्या राष्ट्रवादीत दिसतील अशी चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान जयंत पाटील एका पक्षाचे मोठे नेते आहेत. त्यांच्या बोलण्यातून आजकाल नाराजी जाणवत असल्याचं काँग्रेस नेते विजय वडेट्टीवर म्हणालेत. दरम्यान सत्ताधारी अशा वावड्या उठवून कुरघोड्या करतच असतात असं म्हणत वडेट्टीवारांनी सरकारवर निशाणा साधला. (Vijay Wadettiwar On Jayant Patil) नागपूरमधून ते बोलत होते.

काय म्हणाले वडेट्टीवार?

जयंत पाटील एका पक्षाचे मोठे नेते आहेत. त्यांच्या बोलण्यातून नाराजी जाणवते. त्यांच्या बोलण्याचा नेमका अर्थ काय? आपण फक्त अंदाज बांधू शकतो. छत्रपती मार्गासाठी मोर्चा होता. त्या ठिकाणी मी होतो. पण कुठल्या अर्थाने ते बोलले हे मला माहित नाही. या सगळ्या बावड्या होत्या. बदनाम करण्यासाठी सत्ताधारी वावड्या उठवत असतात. कुरघोड्या सुरू असतात. मुनगंटीवार यांचे भाषण ऐकल्यावर फडणवीस यांची कृपा दिसते. त्यांच्या उपकाराखाली तर दबले आहेत. त्यामुळे अनेक जण पक्ष सोडून गेलेत.

जुन्या कढीला कशाला उत आणता…

दरम्यान उदय सामंतांच्या वक्तव्यावरही त्यांनी प्रत्युत्तर दिले. जुन्या कढीला कशाला ऊत देत आहात. अशा वावड्या उठवून बदनाम करण्याचं काम सुरू आहे. आता एनसीपीत जाणार आहे अशा वावड्या उठल्यात कशा? मी कधी कोणाला भेटलोच नाही. मी काँग्रेसचा नेता आहे. इकडचा मालक तिकडे जाण्यासाठी मी एवढा मूर्ख नाही. उदय सामंत हे माझे मित्र आहे. त्यांना कधी कधी वाटतं आमच्या सोबत यावं म्हणून ते असे बोलतात. दिवस बदलतात. कधीतरी ते आमच्या सोबत येतील त्यांच्याकडे आले तर फायदा होईल. असेही विजय वडेट्टीवार म्हणाले.

शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी हिम्मत द्या..

सुधीर मुनगंटीवार सत्तेत राहून आमचं काम हलकं करता आहे.. सरकार आणि विरोधकांची समान  मागणी आहे… सरकारने न घाबरता शेतकऱ्यांची कर्जमाफी केली पाहिजे. शासकीय कर्मचाऱ्यांचे पगारावर कोठेआधी रुपये खर्च करतात ते 4000 कोटी कशाला घेता… सुधीर भाऊ आमच्याबरोबर आम्ही सुधीर भाऊ सोबत लढा द्यायला तयार त्यांनी रस्त्यावर उतरावं आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत. असेही वडेट्टीवार म्हणाले.

https://www.youtube.com/watch?v=2wwi_fx_-ia

हेही वाचा

Raksha Khadse : रक्षा खडसेंच्या मुलीच्या छेडछाड प्रकरणातील तीन आरोपी अद्याप फरार; टवाळकर पोलिसांना सापडेना, चर्चांना उधाण, पोलिसांवर नामुष्की

अधिक पाहा..

Comments are closed.