आठवडाभरात एकनाथ शिंदेंची दोनदा भेट, सुधाकर बडगुजरांवर हल्लाबोल करत आता नाराज विलास शिंदे राऊतां
विलास शिंडे: गेल्या काही दिवसांपासून नाशिकमधील ठाकरे गटामध्ये अनेक मोठ्या घडामोडी घडत आहेत. शिवसेना शिंदे गटाने ठाकरे गटातील (Shiv Sena UBT) बडे राजकीय नेते आपल्या गळाला लावण्याचे काम सुरु केले आहे. आता ठाकरे गटाचे महानगरप्रमुख विलास शिंदे (Vilas Shinde) हे देखील शिंदे गटात जाणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. आठवडाभरात विलास शिंदे व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (मराठी) या दोघांची दुसऱ्यांदा भेट झाली आहे. त्यामुळे पक्षातरांच्या चर्चांना अधिकच बळ मिळाले आहे. आता शिवसेना ठाकरे गटाचे नाराज महानगर प्रमुख विलास शिंदे हे आज खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांची भेट घेणार आहेत. या भेटीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
विलास शिंदे यांनी शिवसेनेचे माजी उपनेते सुधाकर बडगुजर यांच्यावर थेट हल्लाबोल केला आहे. काही दिवसांपूर्वी सुधाकर बडगुजर यांनी “विलास शिंदे नाराज आहेत” असा गौप्यस्फोट करत खळबळ उडवून दिली होती. यावर विलास शिंदे यांनी जोरदार प्रतिक्रिया दिली आहे.
विलास शिंदेंचा सुधाकर बडगुजरांवर आरोप
“सर्व पदं बडगुजर यांनाच दिली जातात, इतर कार्यकर्त्यांना डावललं जातं. आम्ही अनेकदा नाराज होतो, पण कधीच बोललो नाही. मात्र, बडगुजर यांनी त्याबद्दल भाष्य केले नाही,” आरोप विलास शिंदे यांनी केला आहे. तर संजय राऊत यांचे अत्यंत जवळचे मानले जाणारे आणि पक्षातील प्रमुख पदे मिळवणारे बडगुजर हे नाराज का आहेत? असा सवालही शिंदे यांनी उपस्थित केला आहे. दरम्यान आज होणाऱ्या विलास शिंदे-संजय राऊत यांच्या भेटीत नेमकी काय चर्चा होणार? विलास शिंदे काय निर्णय घेणार? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
माझी भेट घेतली, यात काही गैर नाही : एकनाथ शिंदे
काही दिवसांपूर्वी विलास शिंदे यांच्या कन्येच्या विवाहसोहळ्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थिती लावली होती. त्यानंतर रविवारी (दि. 08) शिवसेनेचे उपनेते अजय बोरस्ते, माजी आमदार नरेंद्र दराडे आणि माजी नगरसेवक दीपक दातीर यांच्या कुटुंबातील विवाह समारंभांनाही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी भेट दिली. या विवाह सोहळ्यांच्या निमित्ताने विलास शिंदे यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री शिंदे यांची धावती भेट घेतली. उपमुख्यमंत्री शिंदे गंगापूर रोडने जात असताना, सोमेश्वरजवळ रस्त्यावरच ठाकरे गटाचे महानगरप्रमुख विलास शिंदे यांनी त्यांचे वाहन थांबवून स्वागत केले. या प्रसंगानंतर, विलास शिंदे लवकरच शिंदे गटात प्रवेश करणार का, यासंबंधी जोरदार चर्चा रंगू लागल्या आहेत. या भेटीबाबत विचारणा केली असता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. “मी काही दिवसांपूर्वी विलास शिंदे यांच्या कन्येच्या लग्नाला गेलो होतो. त्यामुळे त्यांनी माझी सदिच्छा भेट घेतली, यात काही गैर नाही. ते जुने कार्यकर्ते आहेत. मी केवळ लग्नासाठी आलो होतो. त्यामुळे यामागे राजकीय अर्थ काढू नये. विलास शिंदे पक्षात नाराज आहेत का, याची मला कोणतीही माहिती नाही,” असे त्यांनी म्हटले होते.
https://www.youtube.com/watch?v=m0md6ukm0cq
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.