विनायक राऊत आणि कुटुंबीयांकडून अटकपूर्व जामीनासाठी अर्ज; दोन भोंदूबाबा फरार, एकला अटक; सूनेच्या
विनायक राऊत गीतेश राऊत गिरिजा राऊत मराठी बातम्या: सून गिरीजा राऊत (Girija Raut) यांनी केलेल्या तक्रारीनंतर शिवसेना ठाकरे गटाचे माजी खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) आणि कुटुंबीयांकडून अटकपूर्व जामीन अर्ज दाखल करण्यात आला आहे. यावर आता 23 जुलैला सुनावणी होणार असून 23 जुलैपर्यंत विनायक राऊत, गितेश राऊत (Gitesh Raut) यांची चौकशी होणार नसल्याची माहिती समोर येत आहे. विनायक राऊत यांची सून गिरीजा राऊत यांच्या पती, सासऱ्यांसह कुटुंबाविरोधात तक्रार दाखल केल्यानंतर एकूण 7 जणांविरुद्ध कौटुंबिक छळ आणि जादूटोणा विरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर अघोरी कृत्य आणि जादूटोणा प्रतिबंधक कायद्यांतर्गत भोंदूबाबा फिरोज शेख याला अटक करण्यात आली आहे.
न्यायालयाने फिरोज शेखला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तर या सगळ्या प्रकरणी पोलिसांकडून माजी खासदार विनायक राऊत मुलगा गितेश राऊत यांची सुद्धा चौकशी होणार होती. मात्र या सगळ्यांमध्ये विनायक राऊत यांनी अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केल्यानंतर 23 तारखेला या सगळ्या प्रकरणाची सुनावणी होणार आहे. त्यामुळे 23 जुलै पर्यंत विनायक राऊत आणि गितेश राऊत यांचे ठाणे पोलिसांकडून चौकशी केली जाणार नसल्याची माहिती आहे. पती गितेश राऊत यांनी शारीरिक संबंध ठेवण्यास अक्षम असल्याने अघोरी उपाय केले गेल्याचा आरोप गिरीजा राऊत यांनी केला आहे. तर विनायक राऊतांनी सर्व आरोप फेटाळून लावत सुनेने 12 कोटी रुपये मागितल्याचा आरोप केला आहे.
विनायक राऊतांच्या सूनेचे हादरवणारे आरोप, पोलिसांच्या तक्रारीत काय काय? (Vinayak Raut Daughter-in-law Girija Raut)
लग्नानंतर देवदर्शनाचा कार्यक्रम झाल्यानंतर मी व गितेश राऊत हनीमूनसाठी ऊटी येथे गेलो होतो.ऊटी येथे एकूण 6 दिवस राहिलो असता गितेश माझ्या सोबत शारीरिक संबंध न ठेवता माझ्यापासून दूर राहिला होता. त्याबाबत मी त्याला विचारले की तू असा का वागत आहेस, तुझा काही प्रॉब्लेम आहे का? त्यावेळी त्याने मला मेंटल कनेक्ट होणे गरजेचे आहे. शारीरिक संबंध लग्नात अजिबात महत्वाचे नाहीत, मला हनीमूनचा कंटाळा येतो असे सर्व बोलून मला टाळू लागला. ऊटीवरून मुंबईला आल्यानंतर गावी होणा-या आमच्या लग्नाच्या स्वागत समारंभासाठी आम्ही मुळगावी – तळगाव, मालवण येथे जाण्यास निघालो. त्यावेळी आम्ही पालीच्या गणपती मंदिरात दर्शनासाठी थांबले. त्यावेळी गितेश हा गाडीतून उतरून पुढे चालू लागला. मी साडी घातल्याने व अंगावर दागिने असल्याने मला चालण्यास उशीर होऊ लागल्याने त्याने मला सदर ठिकाणी उपस्थित असलेल्या लोकांसमोर तुला कुठे घेऊन जायची तुझी लायकी नाही असे सर्व बोलून गलीच्छ भाषेत अपमानित केले होते. प्रत्येक वेळेस गितेशने कधीही भांडण सुरु केल्यास आजूबाजूचा परिसर, भाषा, वेळ-काळ, माझ्या भावना ह्याचा कसलाही विचार न करता त्याचं मनशांत होईपर्यंत माझ्याशी वाद घातले आहेत, असा धक्कादायक आरोप गिरीजा राऊत यांनी केले आहेत.
इंटरनॅशनल लोकेशन्सलाच जाऊन सेक्स करू शकतो- (Vinayak Raut Daughter-in-law Girija Raut Marathi News)
सन 2018 मध्ये मी व गितेश राऊत तसेच त्यांचा मित्र महेक नंदू व त्याची पत्नी प्रियांका नंदू असे ऑस्ट्रेलिया येथे फिरण्यास गेलो होतो. त्यावेळी सुद्धा गितेश राऊत हा माझ्या जवळ आला नाही आणि मी त्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करता त्याने मला शिवीगाळ करीत जबर मारहाण केली होती. त्यावेळी आमच्यात शारीरिक संबंधांवरून वाद झाले. तू मला हाथ लावशील तर विधवा होशील, अशी धमकी देऊन, मला मारून, ते माझ्याशी खूप भांडले. सदर वेळी त्यांनी मला उपाशी ठेवून आणि मला वाईट वागणूक देऊन प्रचंड छळ केला. शारीरिक संबंधांवर माझ्या पतीचे असे मत होते की, तो फक्त इंटरनॅशनल लोकेशन्सलाच जाऊन सेक्स करू शकतो, भारतात सेक्स करायला तो comfortable नाही. शारीरिक जवळीक साधल्यास मला दूर लोटत तो मला सांगायचा की मी नाजूक मुलगा आहे, तुला अक्कल आहे का मला असा कसा हाथ लावतेस तू? मुंबईच्या घरी जवळीक साधल्यास आपण इथे कसं काही करणार आईला सगळं ऐकू जाईल. तळगाव, मालवणच्या घरी जवळीक साधल्यास म्हणायचा, इकडे आपण काही करू शकत नाही, खाली रवी दादाला (मदतनीस)सगळं ऐकू जाईल, असंही गिरीजा राऊत यांनी तक्रारीत म्हटलं आहे.
विनायक राऊतांनी सगळे आरोप फेटाळले- (Vinayak Raut On Girija Raut)
मी आणि माझ्या कुटुंबीयांवर लावलेले आरोप खोटे आहेत. गेल्या तीन वर्षांपासून गितेश आणि गिरीजा एकत्र राहत नाहीत. 2018 मध्ये घटना घडली असे सांगते आणि 2026 मध्ये त्याची तक्रार करत आहेत. यातंच काही काळं आहे. प्रत्येक वेळी तिचे आई-वडील तिच्यासोबत होते. सध्या त्यांची घटस्फोट केस सुरू आहे, अशी माहिती विनायक राऊतांनी दिली. या नोटिशीमध्ये दर महिन्याला खर्चासाठी 5 लाख द्यावे, अशी मागणीही गिरीजा राऊत यांनी केली होती. याशिवाय 10 कोटींची अधिक रक्कम द्यावी. मानसिक नुकसान भरपाई 2 कोटी द्यावी, अशी मागणी गिरीजा राऊत यांनी केली आहे. 5 रूमचं घर आणि ऑटोमॅटीक गाडी मागितली आहे. या मागण्या पूर्ण होत नाहीत, म्हटल्यावर तिने तक्रार केली, असा दावा विनायक राऊतांनी केला. आम्ही अघोरी उपचारांच्या आरोपांचे पूर्ण खंडन करतो. आम्ही त्या पंथातले नाही. आई-वडील समोर असताना तेव्हा तक्रार केली नाही. या संदर्भात आम्ही न्यायालयात गेलो आहोत, असं विनायक राऊत म्हणाले.
संबंधित बातमी:
Majha Sanman Award 2026 : नितीन गडकरी, आशा पारेख अन् जॅकी श्रॉफ; माझा सन्मानमध्ये उलगडले रंजक किस्से
Comments are closed.