Vinfast नवीन MPV भारतात लाँच, रेंज, किंमत आणि वैशिष्ट्ये जाणून घ्या

- Winfast ची नवीन कार लॉन्च
- MPV सेगमेंटमध्ये कार लॉन्च
- संपूर्ण माहिती जाणून घ्या
भारतात आपल्याला अनेक वाहन कंपन्या दिसतात. परदेशी वाहन कंपन्याही भारतात त्यांची शक्तिशाली वाहने लाँच करत आहेत. अलीकडेच, व्हिएतनामच्या ऑटो कंपनी विनफास्टनेही भारतात पहिली इलेक्ट्रिक एमपीव्ही लॉन्च केली आहे.
VinFast ने भारतात आपली नवीन इलेक्ट्रिक MPV VinFast VF MPV 7 लॉन्च केली आहे. या कारचे बुकिंग काही दिवसांपूर्वी सुरू झाले होते आणि आता ती अधिकृतपणे बाजारात दाखल झाली आहे.
बाबो, 1 लिटर इंधनावर 45 किमी मायलेज! जगातील सर्वाधिक मायलेज देणारी हायब्रीड कार आली आहे
विशेष वैशिष्ट्ये काय आहेत?
या इलेक्ट्रिक एमपीव्हीमध्ये अनेक प्रगत वैशिष्ट्ये आहेत. यामध्ये लेदर सीट्स, कीलेस एंट्री, 19-इंच अलॉय व्हील, एलईडी लाईट्स, 10.1-इंच इन्फोटेनमेंट सिस्टम, चार स्पीकर ऑडिओ सिस्टीम, तसेच एअरबॅग्ज, ABS आणि EBD सारखी वैशिष्ट्ये आहेत.
बॅटरी आणि मोटर क्षमता
कारची बॅटरी क्षमता 60.13 kWh आहे, जी पूर्ण चार्ज केल्यावर सुमारे 450 किमीची रेंज देते. त्याची इलेक्ट्रिक मोटर 204 हॉर्सपॉवर आणि 280 न्यूटन मीटर टॉर्क तयार करते, ज्यामुळे कारला दमदार कामगिरी मिळते.
कार खरेदीदार तयार व्हा! नवीन रेनॉल्ट डस्टरची डिलिव्हरी सुरू, कोणते मॉडेल पहिले मिळेल?
त्याची किंमत किती आहे?
ही MPV भारतात सुमारे 24.49 लाख रुपये (एक्स-शोरूम) किंमतीला लॉन्च करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, कंपनी ३१ मार्च २०२९ पर्यंत मोफत चार्जिंगची सुविधाही देत आहे.
कोणाशी स्पर्धा करणार?
जेव्हा ही सात-सीटर इलेक्ट्रिक MPV बाजारात येईल तेव्हा ती थेट Kia Carens Clavis EV शी स्पर्धा करेल.
Comments are closed.