मुक्काम पोस्ट पिंपरी अन् घर नंबर 403, वाल्मिक कराडच्या नव्या आलिशान फ्लॅटची नवी कहाणी, किंमत तब
पुणे : सध्या बीड जिल्हा संपूर्ण महाराष्ट्राच्या केंद्रस्थानी आहे. येथे मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणात वाल्मिक कराड याच्यावर गंभीर स्वरुपाचे आरोप करण्यात आले आहेत. या हत्या प्रकरणी कराडला सध्या सात दिवसांची एसआयटी कोठडी देण्यात आली आहे. एकीकडे वाल्मिक कराड याच्या अडचणी वाढत असताना आता दुसरीकडे त्याच्या संपत्तीचीही सगळीकडे चर्चा होत आहे. याआधी वाल्मिक कराडचा पुण्यातील उच्चभ्रू सोसायटीत 4 बीएचके फ्लॅट असल्याचे समोर आले होते. आता याच वाल्मिक कराडचा पुण्यात असाच एक आलिशान फ्लॅट असल्याचे उघड झाले आहे. याबाबतची माहिती एबीपी माझाला मिळाली आहे.
एक कोटीचा फ्लॅट
मिळालेल्या माहितीनुसार पुण्यातील पिंपरी चिंचवड येथे असलेला आलिशान फ्लॅट सील करण्याची प्रक्रिया पिंपरी चिंचवड पालिकडेकडून सुरु आहे. असं असतानाच वाल्मिक कराडचा आणखी एक फ्लॅट असल्याचं समोर आलंय. हा फ्लॅट पत्नी मंजली वाल्मिक कराड यांच्या नावावर आहे. पिंक सिटी रोडवरील मि कासा बेला सोसायटीतील 403 नंबरचा हा फ्लॅट आहे. फ्लॅटवर वाल्मिक कराडचे नाव आहे. 1 एप्रिल 2016 पासून हा फ्लॅट अंजली कराड यांच्या नावे असल्याची नोंद पिंपरी पालिकेच्या करसंकलन विभागाकडे आहे. आजच्या बाजारभवानुसार हा फ्लॅट एक कोटींचा आहे. एक कोटींचा हा फ्लॅटदेखील तेवढाच आलिशान असल्याचं बोललं जातंय.
पुण्यात आणखी एक 4 बीएचके फ्लॅट
याआधी कराडचा पिंपरी चिंचवड येथे एक 4 बीएचके फ्लॅट असल्याचं समोर आलं होतं. हा फ्लॅट अतिशय उच्चभ्रू वस्तीत होता. हा महागडा फ्लॅट वाल्मिक बाबुराव कराड आणि त्याची पत्नी अंजली वाल्मिक कराड यांच्या नावावर आहे. काळेवाडी फाट्याजवळच्या पार्क स्ट्रीट सोसायटीत हा प्लॅट आहे. या फ्लॅटच्या इमारतीचे नाव आयवरी असे आहे. आजच्या बाजारभावानुसार या फ्लॅटची किंमत तब्ल साडे तीन कोटी रुपये आहे. सध्या या फ्लॅटमध्ये कोणीही राहात नाही. हा फ्लॅट कराडच्या नावावर असल्याचे समोर आल्यानंतर त्याने या फ्लॅटचा कर थकवल्याचेही समोर आले आहे. याच कारणामुळे हा फ्लॅट सील करण्यात येत आहे.
25 कोटी रुपये खर्च करून विकत घेतले सहा ऑफिस स्पेस
पुण्यात फर्ग्युसन रोड हा अतिशय महागड्या आणि प्रतिष्ठीत भागात आहे. येथेदेखील वाल्मिक कराडची प्रॉपर्टी असल्याचे समोर आले आहे. फर्ग्युसन महाविद्यालयाच्या समोरच एक इमारत आहे. या इमारतीत वाल्मिक कराड आणि त्याच्या टोळीने तब्बल 25 कोटी रुपये खर्च कूरन सहा ऑफिसेस विकत घेतल्याचं म्हटलं जातंय. वाल्मिक कराड, एक महिला आणि विष्णू चाटेच्या नावावर हे ऑफिस बुक करण्यात आले आहेत.
दरम्यान, एकीकडे कराडच्या संपत्तीची सगळीकडे चर्चा होत असताना आता पुण्यातच त्याचा एक कोटी रुपयाचा दुसरा फ्लॅट समोर आला आहे. त्यामुळे आता पुढे नेमके काय होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
हेही वाचा :
वाल्मिक कराडला 7 दिवसांची कोठडी, बीड कोर्टाबाहेर राडा; निदर्शने, घोषणाबाजी, गृहमंत्री जिल्ह्यात या
Walmik Karad : गोपीनाथ मुंडेंनी 1999 मध्ये आणला मकोका, परळीच्या वाल्मिक कराडलाच बसला ‘ दे धक्का’
अधिक पाहा..
Comments are closed.