वांगचुक आपले उपोषण सुरू ठेवणार आहेत.
नवी दिल्ली :
दिल्लीच्या जंतरमंतरवर गेल्या 20 दिवसांपासून उपोषण करणारे प्रसिद्ध कार्यकर्ते आणि सामाजिक नेते सोनम वांगचुक यांनी उपोषण सोडण्यास नकार दिला आहे. आपण 20 जुलैपर्यंत उपोषण करीत राहू, असे त्यांनी स्पष्ट केले. 20 जुलैला कॉक्रोच जनता पक्षाच्या वतीने संसदेवर मोर्चा काढण्यात येणार आहे. हा मोर्चा अपयशी ठरला, तर आपण भूत बनून पुन्हा येऊ असे वक्तव्य त्यांनी केले आहे.
20 जुलैपर्यंत मी काहीही करुन जिवंत राहीन. 20 जुलैला मी संसदेवरील मोर्चाचे नेतृत्व करीन. आमचा हा मोर्चा अपयशी ठरला, तर माझे काय होईल, हे सांगता येणार नाही, असा गर्भित इशारा त्यांनी दिला आहे, असा त्यांच्या विधानाचा अर्थ काढला जात आहे. वांगचुक यांच्या प्रकृतीची वारंवार तपासणी केली जावी आणि डॉक्टरांनी त्यांचा जीव वाचवण्यासाठी योग्य वेळी हस्तक्षेपही करावा. त्यांचा जीव महत्वाचा आहे, असा आदेश दिल्ली उच्च न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे आता केंद्र सरकारचे डॉक्टर्स त्यांच्या प्रकृतीची तपासणी करीत आहेत, अशी माहिती आहे. आवश्यकता भासल्यास त्यांची प्रकृती सुधारण्यासाठी जे करावे लागेल, ते करण्याची सज्जता केंद्र सरकारने ठेवली आहे. दिल्लीतील एम्स रुग्णालयात सर्व सुसज्जता ठेवण्यात आली आहे, अशी माहिती आहे.
Comments are closed.