लग्न करून लुटणाऱ्या टोळीचा वाशिममध्ये धुडगूस; नवरदेवाच्या वडिलांचे अपहरण, तर एकाला जबर मारहाण
वाशिम क्राईम न्यूज : लग्न लावून घरातील सोनं-नाणं घेऊन नवरीसह रफुचक्कर होणाऱ्या टोळीचा पर्दाफाश (Crime News) होणार हे लक्षात येताच या टोळीने नवरदेवाच्या आणि नवरदेवाच्या मामाच्या घरात सशस्त्र घुसून धुडगूस घालत या दोन्ही घरातील साहित्याची तोडफोड केलीहे. हे कमी की काय म्हणत चक्क नवरदेवाच्या बापाचेहे अपहरण केल्याचा धक्कादायक प्रकार वाशिममध्ये (Washim) उघडकीस आला आहे. या प्रकरणी वाशिम पोलिसांनी नवरीसह 5 आरोपींनाही ताब्यात घेतलं असूनयांच्यावर फसवणूकीसह दरोड्याचा (Washim Crime News) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात 13 आरोपींचा सहभाग निष्पन्न झाला आहे. तर तपासाअंती आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता आहे. अशी माहिती वाशिम पोलिसांनी पत्रकार परिषदेत दिली.
या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार राहुल दिलीप मस्के (वय 32 वर्ष) नागेवाडी जि.जालना व सतीश विनायक जाधव (वय 29 वर्ष)रा. जालना यांना अहिल्यानगर येथून ताब्यात घेतले. तर आकाश छगन गायकवाड याला जालना येथून, तर नवरी मुलगी व एक एजंट शांताराम कडूजी खराटे रा.मोहजा यांना सुद्धा ताब्यात घेण्यात आले आहे.
Washim Crime News : तीन गाड्यांच्या माध्यमातून सशस्त्र टोळक्यासह नवरदेवाच्या घरी पोहोचले, अन्….
वाशिमच्या रिसोड तालुक्यातील आसेगाव पेन येथील एका तरुणाचं लग्न जमत नसल्याने लग्न जमवून देणाऱ्या एका एजंटकडून नाशिकच्या मुली सोबत लग्न जुळवून दिल होत आणि 11 डिसेंबरला यांचा विवाह एका मंदिरात पार पडला. लग्नाच्या दोन दिवसाने मुलीच्या माहेरच्या दोन व्यक्ती मुलीला नेण्यासाठी आसेगाव पेन येथे आले. मात्र, या दोघांच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने त्यांचे विचार करतात त्या दोघांनी तिथून पोबारा केला. आपल्या टोळीचा पर्दाफाश होईल त्यामुळे या टोळीने रात्रीच्या सुमारास तीन गाड्यांच्या माध्यमातून सशस्त्र टोळक्यासह नवरदेवाच्या घरी पोहोचले आणि तिथे पोहोचून नवऱ्याची विचारपूस केली. फक्त तर आढळून नाही आल्याद्वारे या टोळक्याने नवरदेवाच्या घरातील साहित्याची तोडफोड केली.
Washim Crime : नववधूच्या शोधात नवरदेवाच्या मामाचं घर गाठलं, तिथेही नासधूस
दरम्यान, हे तोडफोड परिसरातील नागरिकांच्या लक्षात येतात त्यांनी बाहेर येऊन पाहिले असता त्यांना सुद्धा धमकी दिली आणि या टोळक्याने समोर नववधूच्या शोधात नवरदेवाच्या मामाचं घर असलेल्या वाशिम तालुक्यातील मोहजा येथे वळवला आणि तिथे पोहोचून त्यांच्या घरातील साहित्याची आणि दुचाकींची नासधूस केली. तिथेही नववधू सापडत नसल्याने या टोळक्याने थेट नवरदेवाच्या वडिलांना आसेगाव पेन येथून उचलून गाडीत टाकले आणि तिथून पोबारा केला. त्यानंतर जालनाकडे जात असताना या टोळक्यातील काही जणांनी एका खाजगी वाहनाला अडवून बेदम मारहाण करत पैस्याची लूट केली. या घटनेनंतर वाशिम पोलिसांनी विविध 3 पथक शोधासाठी रवाना केल्या होते.
इतर महत्वाच्या बातम्या
आणखी वाचा
Comments are closed.