धक्कादायक! वाशिम जिल्ह्यात गेल्या 24 तासात दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचाराच्या घटना
वॉशिम क्राइम न्यूज: वाशिम जिल्ह्यात गेल्या 24 तासात लैंगिक अत्याचाराच्या दोन वेगवेगळ्या घटनेने जिल्हात एकच खळबळ उडाली आहे. महाविद्यालयीन तरुणीवर अज्ञात व्यक्तीकडून बलात्कार करण्यात आले आहे. वाशिम शहरात एका सहा वर्षीय बालिकेवर बलात्काराची एक घटना घडल्यानंतर 24 तासाच्या आत दुसरी घटना घडल्याचे समोर आले आहे. यातील पहिल्या घटनेत आईस्क्रिम आणण्यासाठी दुकानात गेलेल्या एका 7 वर्षीय चिमुकलीवर 19 वर्षीय तरुणाने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडलीय. वाशिम शहरात 26 फेब्रुवारीच्या संध्याकाळच्या सुमारास ही घटना घडलीय. या प्रकरणी पीडित मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून शहर पोलिसांनी आरोपीविरुद्ध पोक्सो कायद्यासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला असून आरोपीला पोलिसांनी अटक करत बेड्या ठोकल्या आहे.
शेतशिवारात नेत चिमुकलीवर लैंगिक अत्याचार
दरम्यान, ही घटना ताजी असताना, वाशिमच्या रिसोड शहरातील वाशिम मार्गावर एका 17 वर्षीय अल्पवयीन महाविद्यालयीन विद्यार्थिनीवर बलात्कार झाल्याची घटना काल(27 फेब्रुवारी) दुपारच्या दरम्यान घडली. दरम्यान ही अल्पवयीन मुलगी शिक्षणासाठी आपल्या मामा कडे राहत होती. अशातच दुपारी जेंव्हा कॉम्प्युटर क्लास संपून ती बाहेर आली असता त्या वेळेस आरोपीने त्या मुलीवर पाळत ठेऊन तिला एकटे पाहून बोलावून घेतलं. तुझ्या मामाने मला तुला नेण्यासाठी पाठवलं, मी तुझ्या मामाच्या ओळखीचा आहे. असं सांगत आरोपीने तिला ऑटो रिक्षामध्ये बसवून वाशिम मार्गावरील सवड गावा जवळील शेतशिवारात नेलं. यावेळी आरोपीने चाकूचा धाक दाखवून बलात्कार केला आणि घटनास्थळी एकटीला सोडून तो तिथून निघून गेला. जेंव्हा पीडित मुलगी घरी गेली आणि तीने घडलेला सर्व प्रकार नातेवाईकांना सांगितला असता तेंव्हा कुटुंबियांनी तत्काळ पोलीस स्टेशन गाठले आणि तपास सुरू केला. पोलिसांनी याप्रकरणी रिसोड पोलिसात अज्ञात व्यक्ती विरुद्ध गुन्हा दाखल केला असून पोलीस घटनेचा अधिक तपास करत आहे. मात्र वाशिम जिल्ह्यात गेल्या 24 तासात लैंगिक अत्याचाराच्या दोन वेगवेगळ्या घटनेने जिल्हात एकच खळबळ उडाली आहे.
महाराष्ट्रातील सत्ताधाऱ्यांना हे शोभनीय नाही- विजय वडेट्टीवार
राष्ट्रपतीची स्वाक्षरी शक्ती कायद्यावर का झाली नाही? शक्ती कायदाची अंमलबजावणी होऊ नये, यावर सरकारची काय भूमिका आहे? शक्ती कायदा महाराष्ट्रात लागू करायचा नाही का ? हे सरकारने स्पष्ट करावे. शक्ती कायदा कॅबिनेट पुढे हा विषय येईल, तो विधेयक मागे घेतला जाईल. सरकार नव्याने ते विधायक आणणार आहे का? राष्ट्रपतीची स्वाक्षरी का झाली नाही, सरकारने ते का करून घेतले नाही. असे अनेक सवाल करत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी राज्यातील महिलांवरील अत्याचाराच्या घटनांवर भाष्य केलंय.
शक्ती कायदा लागू करण्यासाठी काय अडचण आहे? हा कायदा लागू झाला तर आमच्याच लोकांच्या अडचणी होईल, असं सरकारला वाटत आहे का? महिलांवर अत्याचार वाढत गेले, इज्जत लुटली गेली तरी देणे घेणे नाही, अशी भूमिका सरकारची आहे का? शक्ती कायदा विधेयक मागे घेऊ नका, काय दुरुस्ती करायचे ते करावे. पण या अधिवेशनात हे विधयक आणून राष्ट्रपतीच्या साहिसाठी पाठवावे. राज्य बिहार, यूपी यापुढे आहे, असं म्हणत होतो. मात्र आता महाराष्ट्र महिलांच्या अत्याचार याबाबतीत पुढे आहे. महाराष्ट्रातील सत्ताधाऱ्यांना हे शोभनीय नाही, अशी टीका ही काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर केलीय.
इतर महत्वाच्या बातम्या
अधिक पाहा..
Comments are closed.