Washim Crime News : किरकोळ वाद विकोपाला; तीन तरुणांवर प्राणघातक हल्ला, चक्क गळ्यावर….
वॉशिम क्राइम न्यूज: शुल्लक कारणावरून तीन तरुणांवर प्राणघातक हल्ला करत तिघांचे गळे धारदार शस्त्राने कापल्याची धक्कादायक घटना समोर आलीय. वाशिमच्या खामगाव जिनामागे हा प्रकार घडला असून अज्ञात व्यक्तीने लहाण मुलांना मारहाण करत असल्याचं लक्षात त्याच परिसरातील तीन तरुणाने मारहाण करण्यास मज्जाव केला. त्यामुळे चिडलेल्या तरुणाने तीन जणांवर धारदार शस्त्राने हल्ला (Crime News) करत गळा चिरल्याची घटना घडलीय. या घटनेमुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठत पुढील कारवाई केली आहे.
दरम्यान, यातील तीनही तरुणांवर वाशिमच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. वेळेत उपचार मिळाल्याने या तरुणांचे प्राण थोडक्यात वाचाले आहे. या प्रकरणी वाशिम शहर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस घटनेचा पुढील तपास करत आहे. मात्र या घटनेने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.
DJ वाजवण्यावरून झालेल्या दोन गटातील तूफान राडा
दुसरीकडे अशीच एक खळबळजनक घटना बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील आवार या गावात घडली आहे. काल(14 मार्च)रंगपंचमी दरम्यान डीजे वाजवण्यावरून झालेल्या दोन गटातील राड्यात 12 जण जखमी झाले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 25 जणांना ताब्यात घेतलं असून पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक, राज्य राखीव पोलीस दल, दंगा काबू पथक आणि पोलिसांचा मोठा बंदोबस्त गावात लावण्यात आलेला आहे. सध्या गावात तणावपूर्ण शांतता असून रात्रीच्या वेळीही गस्त वाढवून पोलिसांनी खबरदारी घेत परिस्थितीवर नियंत्रण मिळवले आहे.
25 जणांवर विविध कलमान्वये गुन्हा
दरम्यान, दोन गटात झालेल्या दंगली प्रकरणी पोलिसांनी दोन्ही गटातील 25 जणांवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. खामगाव ग्रामीण पोलिसात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काल रंगपंचमी साजरी करण्यादरम्यान डीजे वर गाणे वाजविण्यावरून मोठा राडा झाला होता. सध्या या गावात राज्य राखीव पोलीस, दंगा काबू पथकासह पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे. पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांनी रात्री उशिरा गावातील परिस्थितीचा पुन्हा आढावा घेतला. सध्या गावातील परिस्थिती नियंत्रणात असून आरोपींची धरपकड अद्याप सुरू असल्याची माहिती पोलिस अधीक्षकांनी दिली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
अधिक पाहा..
Comments are closed.