मुंबईची लाईफलाईन पावसाच्या हातात! RCB विरुद्ध सामना न खेळता जाणार बाहेर? रायपूरमधून मोठी बातमी
RCB वि MI IPL 2026 : आयपीएल (IPL)2026 च्या 55 व्या सामन्यात आज मुंबई इंडियन्स (MI) आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) हे दोन बलाढ्य संघ समोरासमोर येणार आहेत. रायपूरच्या शहीद वीर नारायण सिंह आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होणारा हा सामना मुंबईसाठी फक्त अस्तित्वाची लढाई नसून, स्पर्धेतील त्यांचे भवितव्य ठरवणारा ठरेल. मात्र, जर या महत्त्वाच्या सामन्यात पावसाने हजेरी लावली आणि सामना रद्द झाला, तर मुंबई इंडियन्सच्या प्ले-ऑफच्या आशांना मोठा तडा जाऊ शकतो.
पाऊस पडल्यास काय होईल?
सध्याच्या गुणतालिकेचा विचार करता, मुंबई इंडियन्स 10 सामन्यांपैकी फक्त 3 विजय मिळवून 9 व्या क्रमांकावर आहे. दुसरीकडे, आरसीबीने 10 पैकी 6 सामने जिंकले असून ते सुस्थितीत आहेत. जर आजचा सामना पावसाने वाहून गेला, तर दोन्ही संघांना प्रत्येकी 1 गुण विभागून दिला जाईल. आरसीबीसाठी 1 गुण मिळणे फारसे नुकसानकारक ठरणार नाही, कारण ते आधीच 12 गुणांसह शर्यतीत कायम आहेत. मात्र, मुंबईसाठी हा 1 गुण म्हणजे धोक्याची घंटा ठरू शकतो. सामना रद्द झाल्यास मुंबईचे 11 सामन्यांत केवळ 7 गुण होतील. त्यानंतर उरलेले तिन्ही सामने जिंकले तरी मुंबईला जास्तीत जास्त 13 गुणांपर्यंतच मजल मारता येईल. आयपीएलच्या इतिहासात साधारणपणे प्ले-ऑफमध्ये पोहोचण्यासाठी 14 ते 16 गुणांची आवश्यकता असते. त्यामुळे 13 गुणांवर मुंबईला इतर संघांच्या निकालावर आणि नेट रन रेटवर (NRR) अवलंबून राहावे लागेल.
नेट रन रेटचे आव्हान
मुंबईसाठी फक्त विजयच नाही, तर मोठ्या फरकाने विजय मिळवणे गरजेचे आहे. सध्या मुंबईचा नेट रन रेट (Negative) मध्ये आहे. पाऊस पडल्यास खेळ न होताच सामना संपेल, परिणामी मुंबईला त्यांचा रन रेट सुधारण्याची संधी मिळणार नाही. रायपूरमधील हा सामना मुंबईसाठी 14 गुणांचे लक्ष्य गाठण्याची शेवटची संधी आहे. जर आज पाऊस पडला, तर मुंबईचा प्ले-ऑफचा रस्ता अत्यंत खडतर आणि तांत्रिकदृष्ट्या अशक्यप्राय होईल.
रायपूरचे हवामान काय सांगते?
मुंबईच्या चाहत्यांसाठी एक दिलासादायक बातमी म्हणजे रायपूरमध्ये पावसाची शक्यता अत्यंत कमी आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, संध्याकाळी 7:30 वाजता सामना सुरू होईल तेव्हा पावसाची शक्यता फक्त 1 टक्का आहे. आकाश निरभ्र असेल आणि तापमान 29 अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे. निसर्ग मुंबईच्या बाजूने असला तरी मैदानावर त्यांना आरसीबीच्या तगड्या आव्हानाचा सामना करावा लागेल.
हे ही वाचा –
आणखी वाचा
Comments are closed.