RCB vs MI सामन्यात सर्वाधिक धावा कोणी केल्या? विराट-रोहित यांच्यातील फरक चकित करणारा
आज (१० मे) चाहत्यांना विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्यातील जबरदस्त लढत पाहायला मिळणार आहे. आयपीएल १९ व्या हंगामातील ५४ वा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध मुंबई इंडियन्स असा रंगणार आहे. हा सामना रायपूरमध्ये खेळला जाणार आहे. या हंगामातील हे संघ दुसऱ्यांदा समोरा-समोर येत आहेत. पहिला सामना मुंबईमध्ये खेळला गेला होता, तेव्हा रोहित दुखापतीमुळे त्याला मुकला होता. आता तो पूर्णपणे बरा आहे. त्यामुळे चाहते पुन्हा एकदा विराट विरुद्ध रोहित सामना पाहण्यास उत्सुक आहेत. याआधी दोघांच्या आकडेवारीबाबत जाणून घेऊ.
आरसीबी विरुद्ध एमआय सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या यादीत पहिल्या स्थानी विराट आहे. रोहित तिसऱ्या स्थानावर असून दोघांमधील फरक आश्चर्यचकित करणारा आहे.
विराट आयपीएल पहिल्या हंगामापासून (२००८) आरसीबीकडून खेळत असून त्याने एमआयविरुद्ध ३५ सामने खेळले आहेत. त्याने त्यातील ३४ डावांमध्ये ३२.४ च्या सरासरीने ९७२ धावा केल्या आहेत. यामध्ये सात अर्धशतकांचा समावेश असून तो आरसीबी विरुद्ध एमआय सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. नाबाद ९२ ही त्याची सर्वोच्च धावसंख्या राहिली.
रोहितची आकडेवारी पाहिली तर तो २०११ पासून आरसीबी विरुद्ध एमआय सामन्यांचा भाग राहिला आहे. त्याने २७ सामन्यांत २८.२७ च्या सरासरीने ६४८ धावा केल्या आहेत. यामध्ये ९४ ही त्याची सर्वोच्च धावसंख्या राहिली असून त्याने चार अर्धशतके केली आहेत. यावरून आरसीबी विरुद्ध एमआय सामन्यांमधील विराट आणि रोहित यांच्या धावांचा फरक ३२४ आहे.
या हंगामात झालेल्या या दोन्ही संघांच्या पहिल्या समोरा-समोराच्या लढतीत धावांचा पाऊस पडला होता. तेथे आरसीबीने प्रथम फलंदाजी करताना २४० धावसंख्या उभारली होती. त्यामध्ये फिल सॉल्टने ७८, विराटने ५० आणि कर्णधार रजत पाटीदारने ५३ धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना एमआयकडून शेर्फेन रदरफोर्डने ३१ चेंडूंत ७१ धावांची धमाकेदार खेळी केली होती. यामध्ये एमआयने केवळ २२२ धावा केल्या.
Comments are closed.