वैभव सूर्यवंशी जेव्हा शेवटी हरारेमध्ये खेळला तेव्हा आले होते वादळ, 80 चेंडूंत 175 धावा

भारतीय वरिष्ठ पुरुष क्रिकेट संघ सध्या झिम्बाब्वे दौऱ्यावर आहे. 23 जुलैपासून दोन्ही संघांमध्ये तीन सामन्यांची टी 20 मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेत पुन्हा एकदा स्फोटक युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीवर सर्वांचे लक्ष असणार आहे. त्याने इंग्लंड दौऱ्यात आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते. तेथे त्याला तीन सामने खेळण्याची संधी मिळाली होती, मात्र त्याची कामगिरी निराशाजनक झाली होती. आता तो झिम्बाब्वे दौऱ्यात पुन्हा एकदा वादळी खेळी करणार की काय, याकडे लक्ष आहे.

भारताने हे तिन्ही सामने हरारे स्पोर्ट्स क्लबवर खेळले जाणार आहे आणि क्रिकेट रसिकांना माहितच असेल, जेव्हा वैभवने याच मैदानावर खेळलेल्या त्याच्या शेवटच्या सामन्यात काय केले होते ते. त्याने दीडशतकी धावांची उल्लेखनीय खेळी केली होती. ही खेळी त्याने आयसीसी 19 वर्षाखालील विश्वचषक 2026 चा अंतिम सामन्यात केली होती.

झिम्बाब्वेमध्ये आले होते ‘बेबी बॉस’चे वादळ
इंग्लंडविरुद्धच्या त्या अंतिम सामन्यात वैभवने गोलंदाजांना सळो की पळो करून सोडले होते. त्याने 80 चेंडूंत 15 चौकार आणि 15 षटकारांच्या सहाय्याने 218.75 स्ट्राईक रेटने 175 धावा केल्या होत्या. त्यामुळे भारताने 50 षटकांत 411 धावा केल्या होत्या आणि सामना 100 धावांनी जिंकला होता.

तेव्हाचा संघ आणि फॉरमॅट पूर्णपणे वेगळा होता. आता वैभवला तशी आक्रमक खेळी जमेल की नाही, हे कळेलच. झिम्बाब्वेचा संघही काही कमी नाही, त्यांच्याकडेही अनेक उत्तम गोलंदाज असून ते या युवा खेळाडूला आव्हान देऊ शकतात.

झिम्बाब्वेमध्ये वैभवची कामगिरी
वैभवने झिम्बाब्वेमध्ये आतापर्यंत सात सामने खेळले आहेत. हे सर्व सामने त्याने आयसीसी 19 वर्षाखालील विश्वचषक 2026 स्पर्धेदरम्यान खेळले. त्यामधील सात डावांमध्ये त्याने एक शतक आणि तीन अर्धशतकांसह 439 धावा केल्या होत्या. त्यावेळी त्याची सरासरी 62.71 अशी अप्रतिम होती. त्यादरम्यान त्याने 41 चौकार आणि 30 षटकार मारले होते. त्याच्या या आकडेवारीवरून तेथिल त्याचा अनुभव दर्शवतो. आता तो या अनुभवावर वरिष्ठ संघात कशी कामगिरी करतो, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल. (When Vaibhav Sooryavanshi last played in Harare, he took the field by storm, scoring 175 runs off 80 balls.)

झिम्बाब्वेविरुद्धच्या टी 20 मालिकेसाठी भारतीय संघ-
श्रेयस अय्यर (कर्णधार), वैभव सूर्यवंशी, अभिषेक शर्मा, टिळक वर्मा (उपकर्णधार), इशान किशन (यष्टीरक्षक), शिवम दुबे, सूर्यांश शेडगे, रिंकू सिंग, हर्ष दुबे, प्रिन्स यादव, यश ठाकूर, अशोक शर्मा, मयंक यादव, रविशमन सिंघोई (विकेटकीपर).

Comments are closed.