साऊथम्प्टनच्या खेळपट्टीवर फलंदाज की गोलंदाज कोणाचे वर्चस्व? आतापर्यंतचा रेकॉर्ड अन् भारताला जिंकावेच लागेल, नाहीतर अव्वल…
इंग्लंड आणि भारत यांच्यात पाच सामन्यांची टी २० मालिका खेळली जात आहे. यामधील पहिला सामना पावसामुळे अनिर्णीत राहिला, तर उर्वरित तीन सामन्यांमध्ये इंग्लंडने बाजी मारली. आज (११ जुलै) हे दोन्ही संघ शेवटच्या सामन्यासाठी साऊथम्प्टनमध्ये भिडणार आहेत.
या सामन्यात भारत विजय मिळवून मालिकेचा शेवट तरी विजयाने करण्याच्या तर इंग्लंडचा मालिका ४-० ने जिंकत आयसीसी टी २० क्रमवारीत अव्वल स्थान गाठण्याचा प्रयत्न असणार आहे. यामुळे दोन्ही संघांच्या चाहत्यांचे लक्ष रोझ बाऊलवर होणाऱ्या पाचव्या सामन्यावर असणार आहे.
रोझ बाऊलची खेळपट्टी कोणासाठी अनुकूल
साऊथम्प्टनमधील रोझ बाऊलची खेळपट्टी आतापर्यंत फलंदाजांसाठी अनुकूल राहिली आहे. कारण या हंगामात खेळल्या गेलेल्या सहा टी २० ब्लास्ट सामन्यामध्ये पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या १७४ राहिली. तसेच प्रथम फलंदाजी करताना १७३, १९० आणि २०० धावांचा बचाव केला गेला. त्यामुळे इंग्लंड विरुद्ध भारत सामन्यातील नाणेफेकही महत्त्वाची असणार.
या मैदानावर खेळल्या गेलेल्या १३ टी २० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने ९, तर पाठलाग करणाऱ्या संघाने ४ सामने जिंकले आहेत.
भारताचा साऊथम्प्टनमधील टी २० रेकॉर्ड
भारताने येथे केवळ एकच टी २० सामना खेळला. २०२२ च्या दौऱ्यात भारताने साऊथम्प्टनच्या टी २० सामन्यात प्रथम फलंदाजी करताना १९८ धावा केल्या होत्या. लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंड केवळ १४८ धावसंख्या करू शकला आणि भारताने हा सामना ५० धावांनी जिंकला.
कॅप्टन श्रेयस अय्यरसाठी महत्त्वाचा सामना
भारतीय संघाने श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली आतापर्यंत सहा टी २० सामने खेळले आहेत. त्यापैकी पाच सामने भारताने गमावले, तर सामना पावसामुळे अनिर्णीत राहिला. यावरून त्याच्या कर्णधारपदाखाली भारताचा अद्याप पहिल्या विजयाची प्रतीक्षा आहे.
अय्यरच्या नेतृत्वाखाली भारताने आतापर्यंत दोन टी २० मालिका खेळला आहेत आणि दोन्ही मालिका गमावल्या. त्यामुळे त्याला मोठ्या टीकेला सामोरे जावे लागत आहेत. तसेच भारताचा आणखी एक पराभव झाला तर संघाचे आयसीसी टी २० क्रमवारीतील अव्वल स्थानही जाणार आहे. त्यामुळे मालिकेतील या शेवटच्या सामन्यात भारताबरोबर अय्यरलाही विजय महत्त्वाचा आहे.
Comments are closed.