मेकॅनिकल इंजिनिअर, मुख्यमंत्री फेलोशिपमध्ये काम, पाथर्डीचा अनंत गर्जे पंकजा मुंडेंचा PA कसा बनल


कोण आहेत अनंत गर्जे: पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांचे स्वीय सहाय्यक (PA) अनंत गर्जे (Anant Garje) यांच्या पत्नी डॉ. गौरी गर्जे (Gauri Garje) यांनी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. वरळी येथे 22 नोव्हेंबर रोजी सायंकाळी सातच्या सुमारास त्यांनी टोकाचे पाऊल उचलले. प्राथमिक तपासात हे प्रकरण आत्महत्येचे असल्याची नोंद करण्यात आली होती. मात्र, गौरीच्या कुटुंबियांनी ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा आरोप केलाय. या प्रकरणात अनंत गर्जेंवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना रविवारी रात्री अटक केली आहे. या पार्श्वभूमीवर जाणून घेऊयात कोण आहेत अनंत गर्जे?

Who is Anant Garje: कोण आहे अनंत गर्जे?

अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्याचे अनंत गर्जे हे पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांचे स्वीय सहाय्यक (पीए) आहेत. पेशाने मॅकेनिकल इंजिनिअर असलेले गर्जे यांनी मुख्यमंत्री फेलोशिपअंतर्गत अंबाजोगाई येथे काम केले आणि त्या तालुक्याची सखोल माहिती मिळवली. पंकजा मुंडे यांच्यासोबत काम करण्याची इच्छा त्यांनी स्वतः व्यक्त केली आणि 2022 पासून ते चार वर्षांपासून त्यांच्या स्वीय सहाय्यक म्हणून कार्यरत आहेत.

अनंत गर्जे यांचा विवाह डॉ. गौरी पालवे यांच्याशी 7 फेब्रुवारी 2025 रोजी बीड येथे झाला. दोघांचेही मूळ पाथर्डी तालुक्यातील असून, डॉ. गौरी गर्जे मुंबईतील केईएम रुग्णालयाच्या दंत विभागात डॉक्टर म्हणून कार्यरत होत्या. शनिवारी (दि. 22) वरळीतील बीडीडी वसाहतीत डॉ. गौरी गर्जे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या कुटुंबीयांनी अनंत गर्जे आणि त्यांच्या सासरच्या मंडळींवर छळ, घरगुती हिंसाचार आणि अनैतिक संबंधांचे गंभीर आरोप केले आहेत. या प्रकरणी वरळी पोलिसांनी अनंत गर्जे यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला असून अनंत गर्जेंना अटक करण्यात आली आहे. मागील विधानसभा निवडणुकीत (नोव्हेंबर 2024) भाजप आमदार सुरेश धस यांनी पंकजा मुंडे यांच्यासह त्यांचे स्वीय सहाय्यक अनंत गर्जे आणि संकेत सानप यांच्यावर आपल्या पराभवासाठी षडयंत्र केल्याचा आणि विरोधात काम केल्याचा आरोप केला होता.

Gauri Garje Death: गौरी गर्जेंचा पार्थिवावर अहिल्यानगरमध्ये अंत्यसंस्कार

दरम्यान, सोमवारी (दि. 24) गौरी पालवे-गर्जे यांच्या पार्थिवावर अहिल्यानगर येथील मोहोज देवढे या मूळगावी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पालवे यांच्या नातेवाईकांनी अनंत गर्जे यांच्या घरासमोरच आपल्या मुलीवर अग्निसंस्कार व्हावेत, असा आग्रह धरला होता. यावरुन गर्जे आणि पालवे यांच्या नातेवाईकांमध्ये बाचाबाची झाल्याचे पाहायला मिळाले. पोलिसांनी मध्यस्थी करत हा वाद मिटवला. यानंतर अनंत गर्जे यांच्या घराशेजारीच डॉ. गौरी पालवे यांच्या पार्थिवाला अग्नी देण्यात आला. या परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त असून सध्या येथील परिस्थिती नियंत्रणात आहे.

आणखी वाचा

Anant Garje & Gauri Garje Crime: दुपारी डान्स प्रॅक्टिस केली अन् काही तासात अनंत गर्जेच्या पत्नीने आयुष्य संपवलं; गौरी गर्जेंसोबत अखेरच्या क्षणी नेमकं काय घडलं?

आणखी वाचा

Comments are closed.