आज पुन्हा पाऊस पडेल का?
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
वाऱ्यांची दिशा पालटली असून आज रविवारी देशाच्या अनेक भागांमध्ये वादळी पावसाची शक्यता भारताच्या हवामान विभागाने व्यक्त केली आहे. या पावसासह वीजाही चमकण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली असून देशाच्या पश्चिम भागात सागरतटाजवळच्या प्रदेशात वाऱ्यांचा वेग मोठा असेल, असे भाकित करण्यात आले आहे. देशाच्या मध्य, उत्तर आणि दक्षिण भागांमध्ये वीजांच्या गडगडाटासह मोठा ते मध्यम पाऊस पडेल. सध्या वातावरणात पावसाला अनुकूल परिस्थिती दिसून येते. अग्नेय आणि नैऋत्य दिशांकडून पावसाचे ढग घेऊन वारे भारताच्या भूभागाकडे येत असल्याचे उपग्रहीय छायाचित्रांद्वारे दिसून येते. त्यामुळे काही भागांना सावधानतेचा इशाराही हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.
Comments are closed.