हिटमॅन शर्मा 2027 वर्ल्ड कप खेळणार? बीसीसीआयच्या मीटिंगमधील मोठी अपडेट समोर!

नुकतीच बीसीसीआयची बैठक पार पडली. (Review Meeting) या बैठकीत रोहित शर्माच्या (Rohit Sharma) भविष्याबाबत होणाऱ्या चर्चेवर सर्वांचे लक्ष लागले होते. आज मुंबईतील बीसीसीआय मुख्यालयात ही बैठक पार पडली. या बैठकीत मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर, (Gautam Gambhir) व्हीव्हीएस लक्ष्मण, कसोटी आणि वनडे (ODI) संघाचा कर्णधार शुबमन गिल आणि टी-20 कर्णधार श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) सहभागी झाले होते.

मात्र, मुख्य निवडकर्ते अजित आगरकर (Ajit Agarkar) या बैठकीला उपस्थित राहिले नाहीत आणि ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारेही जोडले गेले नाहीत. बैठकीनंतर बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया (Devjit Saikia) यांनी रोहितच्या भविष्याबाबत सुरू असलेल्या चर्चेवर मोठे वक्तव्य केले आहे. ते म्हणाले, रोहित शर्मा चांगला खेळत आहे, अफवांना खतपाणी घालू नका.

असे सांगितले जात होते की, रोहितचा वेस्ट इंडीज दौऱ्यासाठी संघात समावेश केला जाणार नाही. रोहित भारतासाठी आता फक्त वनडे सामने खेळतो, त्याने टी-20 आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. भारताची पुढील वनडे मालिका वेस्ट इंडीजविरुद्ध असून, ती 27 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे.

यापूर्वी इंग्लंड दौऱ्यावर असतानाही अशी चर्चा समोर आली होती की, निवडकर्त्यांचा पुढील वर्षी होणाऱ्या वनडे विश्वचषकासाठी (World Cup) रोहितच्या नावाचा विचार होणार नाही. मात्र, बीसीसीआयने त्या बातमीचे खंडन केले होते. या सर्व प्रकारामुळे बीसीसीआयने आणि निवडकर्त्यांमध्ये रोहितबाबत संभ्रमाचे वातावरण असल्याचे वाटत होते. आजच्या बैठकीत यावर स्पष्टता येईल, असे मानले जात होते.

परंतु, मुख्य निवडकर्ते अजित आगरकर या बैठकीला उपस्थित न राहिल्याने काही प्रश्न उपस्थित झाले आहेत. यावर बोलताना देवजित सैकिया यांनी पत्रकारांना सांगितले की, ही बैठक अचानक ठरवली होती, त्यामुळे वैयक्तिक कारणांमुळे आगरकर या बैठकीत सहभागी होऊ शकले नाहीत.

या बैठकीत खेळाडूंना वारंवार दुखापती होणे आणि त्यांच्या तंदुरुस्तीवर (Recovery) उपस्थित होत असलेले प्रश्न यांचाही समावेश होता. बैठकीनंतर बोलताना बीसीसीआय सचिव देवजित सैकिया म्हणाले, खेळाडूंना वारंवार दुखापत होणे ही एक मोठी चिंतेची बाब आहे, यासाठी योग्य ती पावले उचलली जातील.

तसेच, काही दिवसांपूर्वी अशी बातमी आली होती की, बीसीसीआय ‘डायरेक्टर ऑफ क्रिकेट’ (क्रिकेट संचालक) हे नवीन पद निर्माण करू शकते आणि या पदासाठी व्हीव्हीएस लक्ष्मण यांची निवड केली जाऊ शकते. मात्र, या बैठकीनंतर बीसीसीआय सचिवांनी अशा प्रकारची कोणतीही नियुक्ती होण्याची शक्यता फेटाळून लावली आहे.

Comments are closed.