VIDEO: औकिब नबीची पहिली काउंटी विकेट, वेगवान गोलंदाजाने भारतीय संघसहकाऱ्यालाच केले बाद!

भारताचा वेगवान गोलंदाज औकिब नबी काउंटी चॅम्पियनशीपमध्ये सरे संघाकडून खेळत आहे. त्याने या स्पर्धेच्या डिव्हिजन 1 मध्ये यॉर्कशायरविरुद्ध खेळताना सामन्याच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे गुरूवारी (3 ऑगस्ट) आपल्या काउंटी कारकिर्दीची पहिली विकेट घेतली. त्याने भारतीय संघसहकारी कुलदीप यादवला बाद केले.
यॉर्कशायरचा पहिला डाव संपला असता नबीने 15 षटकांत 33 धावा देत एक विकेट घेतली. त्याने टाकलेल्या ऑफ स्टम्पच्या बाहेर जाणाऱ्या चेंडूवर कुलदीपने शॉट मारण्याचा प्रयत्न केला, मात्र तो चेंडू बॅटची कड घेऊन सेकंड स्लिपमध्ये उभा असलेल्या ऑली पोपने झेलला.
जम्मू-काश्मीरचा वेगवान गोलंदाज असलेल्या नबीने संघाच्या ऐतिहासिक रणजी ट्रॉफी 2026 च्या विजयात महत्त्वाची कामगिरी केली होती. त्याने स्पर्धेत सर्वाधिक 60 विकेट्स घेतल्या होत्या. तसेच त्याला नुकतेच पार पडलेल्या श्रीलंका दौऱ्यात जसप्रीत बुमराहचा बदली खेळाडू म्हणून भारतीय संघात समाविष्ट केले होते. परंतु त्याला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. त्या दोन्ही सामन्यांसाठी प्रसिद्ध कृष्णा आणि मोहम्मद सिराज यांना संधी दिली गेली.
नबीने देशांतर्गत क्रिकेटमध्ये उत्तम कामगिरी केली असता त्याला 2026 च्या आयपीएल लिलावात दिल्ली कॅपिटल्सने 8.4 कोटी रुपयांना संघात घेतले. त्यानंतर तो पाच सामन्यांमध्ये खेळला, मात्र त्याला एकही विकेट घेता आली नाही. तसेच त्याने 11.46 च्या इकॉनॉमी रेटने धावा दिल्या.
सरेकडून अनेक भारतीय खेळले
सरे संघाकडून याआधीही अनेक भारतीय खेळाडू खेळले आहेत. साई सुदर्शनने 2023 आणि 2024 मध्ये काही कालावधीसाठी सरेकडून काउंटी क्रिकेटचा अनुभव घेतला आहे. तसेच राजस्थानचा फलंदाज महिपाल लोमरोर यालाही या महिन्याच्या सुरूवातीला सहा सामन्यांसाठी करारबद्ध करण्यात आले. तसेच भारताची फिरकीपटू राहुल चहर याचाही सरे संघात समावेश आहे. (Auqib Nabi gets his first county wicket Kuldeep Yadav Surrey vs Yorkshire County Championship 2026)
सरे विरुद्ध यॉर्कशायर सामन्याची स्थिती
यॉर्कशायरचा पहिला डाव – 185/10.
सरेचा पहिला डाव – 83/10.
यॉर्कशायरचा दुसरा डाव – 2/0.
Comments are closed.