Women’s T20 WC 2026 – हिंदुस्थानसाठी ऑस्ट्रेलियाचा करो या मरो सामना
महिलांची टी-20 विश्वचषक स्पर्धाही रोमांचक वळणावर येऊन ठेपली आहे. टीम इंडियाने गुरुवारी बांगलादेशच्या महिला संघाला पराभूत केले असले तरी उपांत्य फेरीचे ‘टेन्शन’ मात्र अद्याप कायम आहे.
एकीकडे हिंदुस्थानने बांगलादेशला पराभूत केले असले तरी दुसरीकडे दक्षिण आफ्रिकेने नेदरलँड्चा पराभव केल्याने हिंदुस्थान आणि आफ्रिकेचे समान गुण झाले आहे. त्यामुळे उपांत्य फेरीचे गणित गुंतागुंतीचे झाले आहे. हिंदुस्थानपुढे पाचव्या आणि साखळी फेरीतील अखेरच्या सामन्यात बलाढय़ ऑस्ट्रेलियाचे आव्हान असणार आहे. उपांत्य फेरीत स्थान मिळवण्यासाठी या ‘करो या मरो’ सामन्यात हिंदुस्थानला ऑस्ट्रेलियाला पराभूत करण्याशिवाय गत्यंतर नाही.
गुरुवारी झालेल्या सामन्यात टीम इंडियाने बांगलादेशवर 5 गडी राखून पराभूत केले. या विजयासह टीम इंडिया ‘अ’ गटामध्ये 4 सामन्यांत 3 विजय आणि 6 गुणांसह दुसऱया स्थानावर आहे, तर दक्षिण आफ्रिकेनेदेखील विश्वचषकाच्या मोहिमेतील चौथ्या सामन्यात नेदरलँडचा पराभव केला आणि गटातील तिसरे स्थान पक्के केले. आफ्रिकेचा संघदेखील ‘अ’ गटामध्ये चार सामन्यांत 3 विजय आणि 6 गुणांसह तिसऱया स्थानी आहे. हिंदुस्थान आणि आफ्रिका यांचे समान गुण असल्याने उपांत्य फेरीतील स्थान पक्के करण्यासाठी दोन्ही संघांना अखरेच्या सामन्यात विजय मिळवणे अनिवार्य असणार आहे.
Comments are closed.