पाकिस्तानपेक्षा वर्ल्ड कप महत्त्वाचा -स्मृती

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

भारतीय महिला संघ आता वर्ल्ड कप खेळण्यासाठी इंग्लंडला रवाना झाला आहे. या दौऱ्यात भारताचा पहिला सामना हा 14 जूनला पाकिस्तानबरोबर होणार आहे. त्यामुळे हा सामना सुरू होण्यापूर्वी त्याला जोरदार प्रसिद्धी मिळायला लागली आहे. याबाबत भारताची उपकर्णधार स्मृती मानधनाने सांगितले की,  ‘‘भारतासाठी पाकिस्तानचा सामना तर महत्त्वाचा असतोच, पण त्यापेक्षा सर्वांसाठी वर्ल्ड कप हा सर्वात जास्त महत्त्वाचा आहे. कारण वर्ल्ड कप ही एक मोठी स्पर्धा आहे. प्रत्येकाला वर्ल्ड कप जिंकण्याचे स्वप्न पडलेले असते. त्यामुळे माझ्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्टी ही वर्ल्ड कप जिंकणे हीच असणार आहे.’’

Comments are closed.