अफगाणिस्तानविरुद्धच्या वनडे मालिकेतून विराट कोहलीच्या जागी तगड्या खेळाडूची एन्ट्री; महत्वाची अप

IND vs AFG एकदिवसीय मालिका: अफगाणिस्तानविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतून विराट कोहलीला (Virat Kohli) वगळल्याच्या बातमीने चाहते कमालीचे निराश झाले आहेत. अनपेक्षितपणे झालेल्या या सूडमुळे आता विराटच्या जागी कोण खेळेल असा प्रश्न क्रिकेट विश्वात आहे. अशातच या खेळाडूबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, कोहलीच्या जागी ऋतुराज गायकवाडला (Ruturaj Gaikwad) भारतीय संघात स्थान दिले जाऊ शकते. वृत्तानुसार, हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे कोहली आगामी एकदिवसीय मालिकेतून बाहेर पडला आहे. विराट कोहलीला (Virat Kohli Replacement) आयपीएल 2026 च्या अंतिम सामन्यात हॅमस्ट्रिंगची दुखापत झाली होती आणि त्याला दोन आठवडे विश्रांती घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. (Virat Kohli Replacement IND vs AFG ODI Series)

दरम्यानअफगाणिस्तानविरुद्धच्या अंतिम एकदिवसीय सामन्यापूर्वी (20जून) तो पूर्णपणे तंदुरुस्त होऊ शकतो, परंतु केवळ एका सामन्यासाठी निवड समिती त्याला संघात स्थान देण्याची शक्यता कमी आहे. ऋतुराज गायकवाडबद्दल बोलायचे झाल्यास, श्रीलंका आणि अफगाणिस्तानविरुद्धच्या त्रिकोणीय मालिकेसाठी त्याला नुकतेच भारत ‘अ’ संघात स्थान देण्यात आले होते. दुखापतग्रस्त रियान परागच्या जागी त्याची भारत ‘अ’ संघाच्या उपकर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली होती. परिणामी आता विराट कोहलीच्या जागी त्याला भारतीय संघात स्थान दिले जाऊ शकते.

IND vs AFG ODI Series: लवकरच भारतीय संघाच्या निवड समितीची बैठक

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील कसोटी सामना 6 जून रोजी सुरू होत आहे. भारतीय संघाच्या निवड समितीची बैठक त्याच दिवशी होणार आहे. या बैठकीत आयर्लंड आणि इंग्लंडविरुद्धच्या मालिकांबाबत निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे. रोहित शर्माबद्दलही चिंता व्यक्त केली जात आहे, ज्याला हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे आयपीएल 2026 मध्ये मुंबई इंडियन्सचे काही सामने चुकवावे लागले होते.

रोहित शर्मा : …..तर रोहित शर्मा ऐवजी दुसऱ्या खेडाडूला संधी

बीसीसीआयने अफगाणिस्तानविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी त्याचा संघात या अटीवर समावेश केला होता की, तो तंदुरुस्त असेल तरच अंतिम 11 खेळाडूंमध्ये असेल. वृत्तानुसार, रोहित अद्याप बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये पोहोचलेला नाही. जर रोहित फिटनेस चाचणीत अपयशी ठरला, तर निवड समितीला त्याच्या जागी दुसऱ्या खेळाडूची घोषणा करावी लागेल.

हे सुद्धा वाचा:

आणखी वाचा

Comments are closed.