Yavatmal news – धावत्या व्हॅनला भीषण आग; चालक थोडक्यात बचावला, पाहा Video
यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव शहरातील तहसील परिसरात धावत्या व्हॅनला अचानक भीषण आग लागल्याने एकच खळबळ उडाली. काही मिनिटांतच वाहनाने पेट घेत डोळ्यादेखत जळून खाक झाले. सुदैवाने चालकाने प्रसंगावधान राखत वेळेत वाहनाबाहेर उडी मारल्याने मोठी दुर्घटना टळली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे.
घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी तत्काळ पाणी टाकून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, वाहनात अवैधरित्या गॅस किट बसवण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
Comments are closed.