यवतमाळ जिल्ह्यात काँग्रेसला मोठं खिंडार; साहेबराव कांबळेसह शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत पक्षप
यवतमाळ बातम्या: यवतमाळ जिल्ह्यात काँग्रेस (Congress) गटात मोठं खिंडार पडलं आहे. काँग्रेसचे नेते साहेबराव कांबळेसह (Sahebrao Kamble) मोठ्या संख्येमध्ये काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिवसेना शिंदे गटात पक्षप्रवेश केला आहे. नंदनवन बंगल्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते साहेबराव कांबळेसह मोठ्या संख्येमध्ये काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेत पक्षप्रवेश केला आहे. शिवसेना आमदार संजय राठोड यांच्या प्रयत्नाने काँग्रेसचे सर्व यवतमाळ जिल्ह्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते शिंदे गटात गुंतलेले झाले आहे. यवतमाळ जिल्ह्यातील काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते शिंदे गटात पक्षप्रवेश केल्यामुळे यवतमाळ जिल्ह्यात काँग्रेसच्या बळ कमी झाला आहे. तर शिवसेनेची ताकद वाढली आहे.
या पार्टीप्रवेशावर बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अभिप्राय दिली. यवतमाळ जिल्ह्यातील काँग्रेसचे विधानपरिषद उमेदवार साहेबराव कांबळे आज शिवसेना शिंदेगटात प्रवेश केला आहे. काँग्रेसचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते त्यांचा सोबत शिवसेनेत पक्षप्रवेश केला आहे. संजय राठोड यांच्या नेतृत्वाखाली हे कार्यकर्ते पार्टी वाढवतील. या पार्टी प्रवेशाने उमरखेडमध्ये आमची ताकद वाढली आहे. या भागामध्ये पालकमंत्री संजय राठोड आहेत. त्यांचा मार्गदर्शनाखाली हे सर्व काम करतील. या भागाच्या विकासला चालना देण्यासाठीची मागणी आहे. ते पूर्ण करतील. नवनिर्वाचित आमदार आणि साहेबराव कांबळे यांच्या नेतृत्वाखालील जनतेला न्याय देतील. असे एकनाथ शिंदे म्हणाले.
Yavatmal Vidhan Parishad Election 2026: पालकमंत्री संजय राठोड ठरले बिनविरोध निवडणुकीसाठी धुरंदर
यवतमाळ विधान परिषदेची निवडणुकीची चुरस जरी संपली असली तरी निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या 5 पैकी 4 उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने यातील राजकीय नाट्यमय घडामोडींनी ही निवडणूक राज्यात चांगलीच चर्चेत राहिली. महाविकास आघाडीचे साहेबराव कांबळे, भाजपचे बंडखोर नितीन भुतडा यांच्यावर वरिष्ठ स्तरावरून आणलेला दबाव आणि अजित पवार गटाच्या साजिद बेग, अपक्ष सय्यद फारुख यांनी उमेदवारी मागे घेतल्याने शिंदे सेनेचे दुष्यंत चतुर्वेदी बिनविरोध झाले. या सर्व राजकीय घडामोडी जुळून आणण्यासाठी धुरंदर म्हणून जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांच्याकडे पाहिले जाते.
महाविकास आघाडीचे उमेदवार साहेबराव कांबळे यांनी 3 जूनला आपला अर्ज मागे घेतला. यामागे ठाण्यातील ‘नंदनवन’ कारणीभूत ठरल्याची चर्चा आहे. मात्र पुरेसे मतदार नसल्याचे कारण सोमर दाखवीत आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. तर महाविकास आघाडीचा पुरस्कृत उमेदवार म्हणून सय्यद फारूक यांनी सुद्धा अर्ज मागे घेतला. तर भाजपचे बंडखोर नितीन पुतळा यांनी मुंबई येथे जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि चंद्रशेखर बावनकुळे यांची धावती भेट घेतली आणि वेट आणि वॉच भूमिका घेण्यास सांगितले. शेवटी अर्ज मागे घेण्याच्या काही क्षणाआधी माजीमंत्री मदन येरावार यांच्या सोबत येत युती धर्माची आठवण येत उमेदवारी मागे घेतली.
Abhijeet Dipke Delhi Airport : बाबासाहेबांचं पुस्तक हाती, अभिजीत दीपके दिल्लीत दाखल
Comments are closed.